अर्थ मंत्रालय
पंतप्रधान स्वनिधी योजने अंतर्गत 23.24 लाख कर्जांना मंजूरी, तर 18.54 लाख कर्जाचे वाटप
Posted On:
22 MAR 2021 5:06PM by PIB Mumbai
गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाने (एमओएचयूए) माहिती दिली आहे की, 15.03.2021 रोजी 23.24 लाख कर्जे मंजूर झाली असून प्रधानमंत्री फेरीवाले, आत्मनिर्भर निधी योजनेंतर्गत (स्वनिधी योजना) लाभार्थ्यांना 18.54 लाख कर्ज वितरित केले गेले आहे.
केंद्रीय अर्थ व कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री श्री अनुरागसिंग ठाकूर यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
कोविड-19 प्रतिबंधासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनचा विपरित परिणाम झालेल्या फेरीवाल्यांना आपली उपजीविका पुन्हा सुरू करता यावी यासाठी एक जून 2020 रोजी फेरीवाल्यांना विणातारण खेळते भांडवली कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाकडून पीएम स्वनिधी योजना सुरू करण्यात आली होती. देशभरातील 50 लाखांपेक्षा जास्त फेरीवाल्यांचा विचार या योजनेत करण्यात आला आहे.
S.Tupe/V.Ghode/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1706647)
Visitor Counter : 260