नागरी उड्डाण मंत्रालय

भारताच्या वंदे भारत मोहिमेने 6 कोटी 75 लाख लोकांना आणले मायदेशी परत

Posted On: 21 MAR 2021 6:46PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 मार्च 2021
 

कोविड-19 महामारीदरम्यान भारताने केलेल्या सुटका कार्यक्रमाद्वारे आतापर्यंत परदेशातील 6 कोटी 75 लाख लोकांना मायदेशी परत आणले.

नागरी  उड्डाण मंत्री श्री. हरदीप सिंह पुरी यांनी केलेल्या ट्विटरमधे म्हटले आहे,की परदेशातील 6 कोटी 75 लाख लोकांना आतापर्यंत परत मायदेशी आणले असून, ही संख्या सतत वाढतच आहे. ते म्हणाले, की ही फक्त जगभरात अडकलेल्या आणि त्रासात सापडलेल्या नागरिकांना आणण्यासाठी सुरू केलेली मोहीम नसून ती आशा आणि आनंदाची मोहीम आहे ज्यायोगे लोकांना समजले की त्यांना संकटकाळी मागे /एकटे टाकले जाणार नाही. 

दिनांक 7 मे 2020 पासून भारताने परदेशात अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी या जगातल्या सर्वात मोठ्या मोहीमेला आरंभ केला. 

आरंभीच्या काळात एअर इंडिया आणि त्याची सहकारी एअर इंडिया एक्स्प्रेस यांनी या कार्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर इतर विमान कंपन्यांना ही या मोहिमेत सहभागी करून घेण्यात आले.

हवाई सुटकेबरोबरच नौदलाच्या जहाजांचा  देखील भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यात उपयोग केला गेला.

 

* * *

M.Chopade/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1706452) Visitor Counter : 132