आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवेत भारताने ओलांडला महत्त्वाचा टप्पा
Posted On:
21 MAR 2021 2:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 मार्च 2021
आज प्राथमिक आरोग्य सेवा सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने भारताने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला. 31 मार्च 2021 पर्यंत 70,000 आयुष्मान भारत- आरोग्य व कल्याण केंद्रे (एबी-एचडब्ल्यूसी) कार्यान्वित करण्याचे नियोजित लक्ष्य वेळेच्या अगोदर गाठण्यात आले आहे.
कोविड महामारी असूनही केंद्र आणि राज्ये / केंद्रशासित प्रदेश यांच्यातील उच्च पातळीचा समन्वय, नियोजनातील दूरदृष्टी, अनुकूलतेत लवचिकता, प्रक्रियेचे मानकीकरण आणि सर्व स्तरांवर नियमित संवाद यामुळे सक्षम देखरेख आणि समस्यांचे त्वरित निराकरण सुनिश्चित होऊन या वेगाने हे उद्दिष्ट साध्य करता आले. प्रभावी विकेंद्रीकरण आणि सहकारी संघराज्य प्रक्रियेचे हे द्योतक आहे.
एप्रिल 2018 मध्ये आयुष्मान भारत- आरोग्य आणि कल्याण केंद्रांची (एबी-एचडब्ल्यूसी) सुरुवात हा भारताच्या सार्वजनिक आरोग्याच्या इतिहासातील कलाटणी देणारा क्षण आहे. डिसेंबर 2022 पर्यंत शहरी व ग्रामीण भागातील 1,50,000 उप-आरोग्य केंद्रे आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे ही आयुष्मान भारत- आरोग्य आणि कल्याण केंद्रांमध्ये रूपांतरित करण्याचे आणि सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्यसेवा देण्याचे लक्ष्य ठेवले गेले ज्यात प्रतिबंधात्मक आणि आरोग्यासाठी सामुदायिक स्तरावर निरंतर काळजीद्वारे आरोग्य प्रोत्साहनचा समावेश असून ते ग्रामीण आणि शहरी भागातील समुदायाशी संबंधित, सर्वसमावेशक आणि मुक्त आहे, तसेच कल्याणावरही लक्ष केंद्रित करते. या मिशन मोड पध्दतीचा उद्देश सर्वसमावेशक आरोग्य सेवेविषयीचा भारताचा दृष्टिकोन साकार करणे देखील आहे.
नव्याने भर्ती केलेले आणि कम्युनिटी हेल्थ ऑफिसर (सीएचओ) म्हणून नियुक्त केलेले बीएससी नर्सिंग / बीएएमएस पात्रतेसह प्रशिक्षित डॉक्टर नसलेले आरोग्य कर्मचारी हे आयुष्मान भारत- आरोग्य आणि कल्याण केंद्रांच्या उप-आरोग्य केंद्राच्या प्राथमिक देखभाल चमूचे आणि आशा कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करतात.
विद्यमान गर्भधारणाविषयक आणि बाल आरोग्य (आरएमएनसीएए + एन) सेवा आणि संसर्गजन्य रोग सेवांचा विस्तार आणि बळकटीकरण करण्याव्यतिरिक्त, कार्यशील आयुष्मान भारत- आरोग्य आणि कल्याण केंद्र (उच्च रक्तदाब, मधुमेह आणि मुखाचा, स्तनाचा आणि गर्भाशयाचा अशा 3 सर्वसामान्य कर्करोगाची चाचणी आणि व्यवस्थापन संबंधित) संसर्गजन्य नसलेल्या आजारांबाबत सेवा प्रदान करते आणि मानसिक आरोग्य, ईएनटी, नेत्ररोगशास्त्र, मुखाचे आरोग्य, जिरायट्रिक आणि उपशामक आरोग्य सेवा आणि आघात काळजी इत्यादींसाठी प्राथमिक आरोग्य सेवा वाढविते
सर्व सीपीएचसी सेवांच्या पूरकतेसाठी आवश्यक रोगनिदानविषयक यादी वाढविली असून काळजी केंद्र किंवा हब आणि स्पोक सेवा म्हणून पुरविली जाईल.
- एचएससी-एचडब्ल्यूसी: विद्यमान 7 ते 14 चाचण्या
- पीएचसी-एचडब्ल्यूसी: विद्यमान 19 ते 63 चाचण्या
- उच्च रक्तदाब व मधुमेहावरील उपचारांसह रूग्णांना औषधांचा अखंड पुरवठा व्हावा यासाठी राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या राष्ट्रीय मोफत औषध सेवा उपक्रमांतर्गत आवश्यक असणार्या औषधांची यादी सर्वच आरोग्य व पीएचसी एबी-एचडब्ल्यूसीमध्ये वाढविण्यात आली आहे.
- एसएचसी-एचडब्ल्यूसी: विद्यमान 57 ते 105 औषधे
- पीएचसी-एचडब्ल्यूसी: विद्यमान 232 ते 172 औषधे
एचडब्ल्यूसी, प्राथमिक आरोग्य सेवेचा एक महत्त्वाचा घटक म्हणून काळजी घेण्याच्या दृष्टीने लैंगिक समानता दाखवत सकारात्मक परिणामाची उच्च क्षमता दर्शविते. आजपर्यंत, सुमारे 41.35 कोटी लोकांची या एबी-एचडब्ल्यूसीमध्ये काळजी घेतली गेली आहे. त्यापैकी सुमारे 54% महिला आहेत.
एचडब्ल्यूसी विविध उपक्रमांद्वारे कल्याणकारी आणि निरोगी जीवनशैलीवर देखील लक्ष केंद्रित करतात. आतापर्यंत या केंद्रांनी 64.4 लाख कल्याणकारी सत्रे घेतली आहेत. स्थानिक संदर्भानुसार, राज्ये योग, स्थानिक खेळ, झुम्बा (पूर्वोत्तर राज्यांमध्ये) इत्यादींसह निरोगीपणाचे विविध उपक्रम राबवित आहेत. ही केंद्रे वर्षभरात 39 आरोग्य संवर्धनाच्या दिवसांचे पालन करतात.
एचडब्ल्यूसीद्वारे पुरविल्या जाणार्या सेवेचा अत्यावश्यक घटक म्हणजे प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा. कम्युनिटी बेस्ड असेसमेंट चेकलिस्ट (सीबीएसी) च्या माध्यमातून 30 वर्षांवरील लोकसंख्या मोजण्याचे काम सामुदायिक आरोग्य कर्मचारी (आशा आणि एएनएम) द्वारे केले जाते आणि जोखीम स्तरीकरणाच्या आधारावर अशा व्यक्तींची तपासणी केली गेली आहे. गंभीर स्थितीत असलेल्या व्यक्तींवर आवश्यक पाठपुरावा करून उपचार केले जातात. आतापर्यंत उच्च रक्तदाबासाठी 9.1 कोटी, मधुमेहासाठी 7.4 कोटी, मुखाच्या कर्करोगासाठी 4.7 कोटी, स्त्रियांमध्ये स्तनाच्या कर्करोगासाठी 2.4 कोटी आणि महिलांमध्ये गर्भाशय कर्करोगाच्या 1.7 कोटी चाचण्या करण्यात आल्या आहेत.
दूरध्वनीवरून सल्ला देण्याची सेवा ही एचडब्ल्यूसीचा आणखी एक प्रमुख घटक आहे. एचडब्ल्यूसीमध्ये अशाप्रकारच्या 9.45 लाखाहून अधिक सेवा देण्यात आल्या आहेत.
कोविड -19 महामारीच्या काळात, एबी-एचडब्ल्यूसीने कोविड प्रतिबंधाशी संबंधित सार्वजनिक आरोग्य कार्यवाही करण्यात आणि कोविड व्यतिरिक्त अनिवार्य आरोग्य सेवा सक्षम करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या कोविड कालावधीत (1 फेब्रुवारी 2020 ते आजपर्यंत) सुमारे 75% कोविड व्यतिरिक्त चाचण्या करण्यात आल्या आहेत, जे सध्याच्या सार्वजनिक आरोग्य आव्हानात एबी-एचडब्ल्यूसी वरील लोकांचा विश्वास दर्शवितात.
एबी-एचडब्ल्यूसी भारताच्या आरोग्य प्रणालींसाठी निर्णायक शक्ती असल्याचे सिद्ध होत आहेत. वितरित सेवांचे प्रमाण आणि अंमलबजावणीची गती यामुळे आत्मविश्वास निर्माण होतो की हा कार्यक्रम लोकांना परवडणारी सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा देण्याच्या दृष्टीकोनातून साकार झाला आहे.
एबी-एचडब्ल्यूसी अंतर्गत प्रदान केलेली विस्तारित सेवा पॅकेजेस खालीलप्रमाणे आहेत:
1.गर्भधारणा आणि बाळंतपणाच्या वेळची काळजी
2. नवजात आणि शिशु आरोग्य सेवा.
3. बालपण आणि पौगंडावस्थेतील आरोग्य सेवा.
4. कुटुंब नियोजन, गर्भनिरोधक सेवा आणि इतर गर्भधारणेसंबंधित आरोग्य सेवा
5. संसर्गजन्य रोगांचे व्यवस्थापनः राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम
6. तीव्र, साध्या आणि किरकोळ आजारांसाठी रुग्णांची काळजी
7. क्षयरोग आणि कुष्ठरोग सारख्या जुनाट संसर्गजन्य रोगांचे परीक्षण, प्रतिबंध, नियंत्रण व व्यवस्थापन
8. मूलभूत मौखिक आरोग्य सेवा
9. मानसिक आरोग्य आजारांची चाचणी आणि मूलभूत व्यवस्थापन
10. सर्वसामान्य नेत्रविषयक व कान, नाक, घसा यांच्या समस्येची काळजी
11. वृद्ध आणि उपशामक आरोग्य सेवा
12. आपत्कालीन वैद्यकीय सेवा.
एबी-एचडब्ल्यूसी पोर्टलच्या आधारे 20.03.2021 रोजी एबी-एचडब्ल्यूसी कार्यान्वित करण्याच्या कामगिरीची स्थिती
Sl.No.
|
Name of the State
|
No. of Functional HWCs as on 21.3.2021
|
1
|
Andaman & Nicobar Islands
|
80
|
2
|
Andhra Pradesh
|
3411
|
3
|
Arunachal Pradesh
|
211
|
4
|
Assam
|
2212
|
5
|
Bihar
|
1738
|
6
|
Chandigarh
|
28
|
7
|
Chhattisgarh
|
2661
|
8
|
Dadra & Nagar Haveli
|
60
|
9
|
Daman & Diu
|
30
|
10
|
Goa
|
102
|
11
|
Gujarat
|
5097
|
12
|
Haryana
|
725
|
13
|
Himachal Pradesh
|
741
|
14
|
Jammu & Kashmir
|
1114
|
15
|
Jharkhand
|
1462
|
16
|
Karnataka
|
5838
|
17
|
Kerala
|
2318
|
18
|
Ladakh
|
89
|
19
|
Lakshadweep
|
3
|
20
|
Madhya Pradesh
|
6146
|
21
|
Maharashtra
|
8603
|
22
|
Manipur
|
180
|
23
|
Meghalaya
|
248
|
24
|
Mizoram
|
139
|
25
|
Nagaland
|
218
|
26
|
Odisha
|
1629
|
27
|
Puducherry
|
119
|
28
|
Punjab
|
2550
|
29
|
Rajasthan
|
2482
|
30
|
Sikkim
|
62
|
31
|
Tamil Nadu
|
4286
|
32
|
Telangana
|
1577
|
33
|
Tripura
|
291
|
34
|
Uttar Pradesh
|
8223
|
35
|
Uttarakhand
|
661
|
36
|
West Bengal
|
4681
|
Total
|
70015
|
* * *
Jaydevi PS/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1706413)
Visitor Counter : 334