संरक्षण मंत्रालय

भारतीय नौदलातील सर्वात पराक्रमी तुकडी आयएनएस 310, चा, 21 मार्च 2021 ला हिरक महोत्सवी कार्यक्रम

Posted On: 20 MAR 2021 5:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 मार्च 2021

भारतीय नौदलाची हवाई स्क्वाड्रन (INAS) 310, कोब्रा युनिट, भारतीय नौदलाची गोव्यातील ही अद्भूत सागरी तुकडी  21 मार्च 2021 रोजी आपला हिरक महोत्सवी स्थापना दिन साजरा करत आहे. फ्रांसच्या हेरेस इथे 21 मार्च 1961 साली या तुकडीची स्थापना झाली होती. आज ही तुकडी भारतीय  नौदलाच्या सर्वात पराक्रमी तुकड्यांपैकी एक समजली जाते.

INAS310 ने 1961 पासून नौदलाच्या अनेक ऑपरेशन्समध्ये देशासाठी अलौकिक सेवा बजावली आहे. तसेच देशाच्या किनारी भागात, दररोज टेहळणी कार्यही सातत्याने सुरु ठेवले आहे. या तुकडीकडे, 1991 पर्यंत जहाजावरून उड्डाण करू शकणारे अलीझ हे लढाऊ विमान होते आणि त्यानंतर किनाऱ्यावरील डोर्नियार-228 लढावू विमान या तुकडीकडे आले.

गेल्या एका वर्षात, कोविड-19 महामारीच्या काळात, देशाच्या कानाकोपऱ्यात भ्रमण करत, या तुकडीच्या लढाऊ विमानांनी अत्यावश्यक औषधे, कोविड चाचण्यांच्या किट्स, तसेच वैद्यकीय चमू आणि उपकरणे अशा हजारो गोष्टी गरजूंपर्यंत पोहचवल्या.

 

G.Chippalkatti/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1706295) Visitor Counter : 186