आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

रेड क्रॉस सोसायटीच्या मुख्यालयात डॉ हर्ष वर्धन यांनी एनएटी चाचणी सुविधेचे उद्‌घाटन केले


“कोविड -19 महामारी सर्वोच्च पातळीवर असताना 80 आयआरसीएस रक्तपेढ्यांनी उल्लेखनीय भूमिका बजावली”

Posted On: 20 MAR 2021 4:44PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 मार्च 2021

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री आणि इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे अध्यक्ष डॉ हर्ष वर्धन यांनी आयआरसीएस एनएचक्यू ब्लड सेंटर येथे न्यूक्लिक ऍसिड  चाचणी (एनएटी) सुविधेचे उद्‌घाटन केले. तसेच त्यांनी दोन रक्त संकलन वाहनांसह तीन सुसज्ज वाहनांचे उद्‌घाटन केले ज्यांचा वापर रेड क्रॉस रक्त केंद्रात रक्तदान शिबिरे आयोजित करण्यासाठी ब्लड युनिट्सची संख्या वाढवण्यासाठी केला जाईल.

कोविड -19 महामारी सर्वोच्च पातळीवर असताना रक्तदान शिबिरे आयोजित करून रक्त संकलित करण्यात  भारतीय रेड क्रॉसच्या 80 रक्तपेढ्यांनी उल्लेखनीय भूमिका पार पाडल्याबद्दल डॉ. हर्ष वर्धन यांनी रेडक्रॉसचे अभिनंदन केले. रेडक्रॉसच्या रक्तपेढ्या निवासी वसाहतींमध्ये कार्यरत होत्या आणि शिबिरे आयोजित केली तसेच रक्तदात्यांना रेडक्रॉस रक्त केंद्रात येऊन रक्तदान करण्यासाठी वाहतुकीची सोय देखील पुरवली.

सुरक्षित रक्ताची मागणी आणि उपलब्धता यांच्यातील तफावत कमी करण्याबाबत ते म्हणाले की  स्वेच्छेने रक्तदान करण्यासाठी सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे.  शैक्षणिक कार्यक्रमाची रचना अशी हवी की नियमित रक्तदानाचा फायदा समाजाला समजेल. शैक्षणिक संस्था, औद्योगिक कंपन्या, सामाजिक-सांस्कृतिक संस्था, धार्मिक गट आणि सरकारी संस्था यांना प्रोत्साहनासाठी आवाहन करावे. जनतेला प्रोत्साहित करण्यासाठी आणि ऐच्छिक रक्तदानासाठी सर्वात प्रभावी मार्गाने त्यांना सहभागी होण्यासाठी जागरूक करण्यासाठी प्रसारमाध्यमांची मदत घेतली जावी, असे डॉ हर्ष वर्धन म्हणाले.

 

S.Thakur/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1706291) Visitor Counter : 181


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu