विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
रोग निदानासाठी किफायतशीर किंमतीत स्मार्ट नॅनो उपकरणांवर काम करणार्या संशोधकाला विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळाचा सर्वोत्कृष्ट महिला पुरस्कार प्रदान
Posted On:
18 MAR 2021 9:56AM by PIB Mumbai
हैदराबादच्या राष्ट्रीय प्राणी जैव तंत्रज्ञान संस्था (एनआयएबी) मधील संशोधक डॉ. सोनू गांधी यांनी नुकतीच संधीवात, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजार (सीव्हीडी) आणि जपानी एन्सेफलायटीस (जेई) या आजारांचे निदान करण्यासाठी स्मार्ट नॅनो डिव्हाईस म्हणजेच अत्यंत लहान असे वेगाने निदान करणारे उपकरण विकसित केले आहे. यासाठी त्यांना प्रतिष्ठेच्या विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळाच्या सर्वोत्कृष्ट महिला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
विज्ञान आणि अभियंत्रिकी क्षेत्रात आघाडीवर राहून काम करणाऱ्या युवा महिला संशोधकांना त्यांच्या उल्लेखनीय संशोधनासाठी, विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळ (एसईआरबी), विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (डीएसटी) यांच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. डॉ. सोनू गांधी यांच्या समूहाने विकसित केलेल्या स्मार्ट नॅनो डिव्हाईसमुळे विशिष्ट प्रतिपिंडातील अमोनियापासून सेंद्रिय घटक मिळवून (अमाईन )आणि संयोगातून आजारांची जैवचिन्हे शोधण्यास मदत झाली.
अति-उच्च संवेदनशीलता, शस्त्रक्रिया करण्यास सुलभ आणि पॉईंट ऑफ केअर चाचणीसाठी सुलभपणे चीपमध्ये एकीकृत होण्यासाठी, किमान वेळेत प्रतिसाद ,हे विकसित केलेल्या संवेदकाचे फायदे आहेत. या विकसित केलेल्या संवेदकाने पारंपरिक तंत्रापेक्षा स्पष्ट फायदा दर्शविला आहे. हा संवेदक अत्यंत संवेदनशील आहे. यामुळे आजाराचे लवकर निदान, त्वरित खात्री, जास्त प्रभावी आणि खर्चीक उपचारात यामुळे सुधारणा होईल. सूक्ष्मातीत द्रव्ये
आणि जैव रेणू यांच्या संयोगाची यंत्रणा समजून घेऊन उपकरणाचा पृष्ठभाग म्हणजेच ऊर्जापरिवर्तकातुन जिवाणू आणि विषाणूजन्य आजाराचे निदान, पशुवैद्यकीय आणि कृषी प्रयोग, अन्न विश्लेषण आणि पर्यावरणीय देखरेखीच्या दृष्टीने एका यंत्रणेतून प्राप्त ऊर्जा परिवर्तीत करून नवीन तंत्रज्ञान याउलट जैवचिन्हे विकसित करणे या आधारावर त्यांची कामगिरी आधारित आहेत.
फळे आणि भाज्यांच्या पिकातील झाडांच्या पानांवरील आणि मातीमधील, जंतू आणि किटकांना रोखण्यासाठी वापरण्यात येणारी कीटकनाशके शोधण्यासाठी विद्युत रासायनिक आणि सूक्ष्मद्रव्य आधारित नॅनो सेन्सर डॉ. सोनू यांच्या प्रयोगशाळेने विकसित केला आहे. समांतर केलेल्या अभ्यासानुसार , त्यांच्या प्रयोगशाळेत त्यांनी कर्करोगासाठी अतिवेगवान संवेदना असलेली जैवचिन्हे विकसित केले आहेत. कर्करोगासाठीची जैवचिन्हे यूरोकिनाझ प्लास्मीनोजेन अॅक्टिवेटर रिसेप्टर (यूपीएआर ) नावाने विकसित केली असून याचा प्रभावी साधन म्हणून वापर होऊ शकतो. कर्करोग रुग्णांमधील यूपीएआरच्या तपासणीसाठी हा समर्थनीय पर्याय ठरू शकतो. बायोसेन्सर आणि बायोइलेक्ट्रॉनिक्स’ या नियतकालीकामध्ये त्यांची ही कामगिरी प्रकाशित झाली आहे.
अलीकडेच त्यांच्या प्रयोगशाळेने, दूध आणि मांसाच्या नमुन्यांच्या तपासणीतुन अँप्टामेर्स या विशिष्ट रेणूंच्या साहाय्याने (अल्फाटॉक्झिन एम 1) हा विषारी पदार्थ शोधण्यासाठी जलद आणि संवेदनशील सूक्ष्मद्रव्य उपकरण तयार केले आहे.अन्न सुरक्षेच्या दृष्टीने प्रभावी आणि परिणामकारक विश्लेषणासाठी त्याच ठिकाणी अन्न पदार्थातील विषारी पदार्थ अल्फाटॉक्झिन बी 1जलदगतीने शोधण्याच्या दृष्टीने त्यांनी मायक्रोफ्लूइडिक पेपर डिव्हाइस म्हणजेच सूक्ष्मद्रव्य कागद उपकरण तयार केले आहे. आरोग्याच्या बाबींसाठी संवेदनशील, किफायतशीर आणि जलद रोग निदानासाठी ,विद्युत रासायनिक जैवसंवेदकावर आधारित सीआरआयएसपीआर-कॅस 13 आणि क्वांटम डॉट्स वापरून साल्मोनेलामधील मल्टिपल सॅरोवर्स शोधून काढणे हे त्यांच्या सध्याच्या आणखी एका प्रकल्पाचे वैशिष्ट्य आहे. आरोग्य समस्यांचे निराकरण करण्याच्या दृष्टीने सुलभ व्यवस्थापन आणि आजाराचे लवकर आणि परिपूर्ण निदान करण्यासाठी किफायतशीर आणि फिल्ड ऍप्लिकेबल विश्लेषणात्मक उपकरण विकसित करण्यासाठी त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.
***
UU/SC/CY
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1705743)
Visitor Counter : 228