सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या तंत्रज्ञान केंद्रे, विस्तार केंद्रे आणि उद्यम एक्सप्रेसचे नितीन गडकरी यांनी केले आभासी पद्धतीने उद्घाटन
Posted On:
10 MAR 2021 4:20PM by PIB Mumbai
सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम आणि मध्य प्रदेशातील भोपाळ येथे दोन तंत्रज्ञान केंद्रांचे, भव्य तंत्रज्ञान केंद्रांच्या तीन विस्तार केंद्रांचे आणि सात फिरत्या उद्यम एक्सप्रेसचे उद्घाटन केले. यावेळी बोलताना गडकरी म्हणाले की, जर देशाला गरीबी, उपासमार आणि बेरोजगारी या तीन सर्वात मोठ्या समस्यांवर मात करायची असेल तर आपल्याला रोजगार निर्माण करावा लागेल. “ज्ञानाचे संपत्तीत रुपांतर” करण्यावर त्यांनी भर दिला.
"आत्मनिर्भर भारत बनवण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी जिल्हावार विकास योजनेवर” मंत्री महोदयांनी भर दिला.
संशोधन आणि नवोन्मेषासाठी भारतीय युवा पिढीतील प्रचंड क्षमतेविषयी बोलताना गडकरी म्हणाले की, “देशातील तरुणांना यशस्वी होण्यासाठी प्रदर्शनासह, सहाय्य आणि उपकरणाची गरज आहे”. ते म्हणाले की, देशात कच्चा माल, तरुण व कुशल मनुष्यबळाची प्रचंड क्षमता आहे, सर्व उद्योजकांना पाठबळ देण्यासाठी सरकार तयार आहे आणि यासाठी आयआयटी, अभियांत्रिकी महाविद्यालये आणि समाजातील यशस्वी व्यक्तींचे सहकार्य घेणे आवश्यक आहे.
यावेळी बोलताना एमएसएमई राज्यमंत्री प्रतापचंद्र सारंगी म्हणाले की, “सुमारे 2,50,000 विद्यार्थी या केंद्रांवर प्रशिक्षण घेत आहेत आणि साधन कक्षात सामान्य यंत्रणेपासून रोबोटिक्सच्या क्षेत्रापर्यंत काम होते.” फिरत्या उदयम एक्स्प्रेस विषयी बोलताना सारंगी म्हणाले की, “या फिरत्या व्हॅन खेड्यात जाऊन लोकांना प्रशिक्षण देण्याबरोबर उद्योजकतेच्या सर्व बाबींविषयी जागरूक करतील”. ते म्हणाले की या व्हॅनमुळे लोकांना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग याविषयी सर्व माहिती मिळेल.
देशभरात नवीन तंत्रज्ञान केंद्रे आणि विस्तार केंद्रे स्थापन करून, एमएसएमई मंत्रालयाचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे भविष्यात तयार नवीन तंत्रज्ञान केंद्रांच्या माध्यमातून उभ्या-आडव्या विस्तारासह अधिकाधिक राज्ये आणि प्रदेशात तंत्रज्ञान केंद्रांच्या जाळ्याच्या भौगोलिक पाऊलखुणा वाढविणे.
Jaydevi PS/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1703804)
Visitor Counter : 263