नागरी उड्डाण मंत्रालय

बरेलीसाठीच्या पहिल्या उड्डाणाला हिरवा झेंडा


आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्ताने पहिले उड्डाण महिला कर्मचाऱ्यांद्वारे

Posted On: 08 MAR 2021 7:19PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 मार्च 2021

 

केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) हरदीप सिंह पुरी यांनी आज नवी दिल्ली ते बरेली या मार्गावरील पहिल्या उड्डाणाला हिरवा झेंडा दाखविला. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्ताने सर्व महिला कर्मचाऱ्यांद्वारे केलेल्या या पहिल्या उड्डाणासाठी कामगार आणि रोजगार मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) आणि बरेलीचे खासदार संतोष गंगवार देखील.उपस्थित होते. नागरी उड्डाण मंत्रालयाचे सचिव प्रदीप सिंह खारोला आणि  एअर इंडियाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक राजीव बन्सल हे ही  या सोहळ्याला दूरदृश्य प्रणालीद्वारे  उपस्थित होते. नागरी उड्डाण मंत्रालयाच्या संयुक्त सचिव श्रीमती उषा पाधी या देखील यावेळी उपस्थित होत्या. नागरी उड्डाण मंत्रालयाचे आणि भारतीय विमान प्राधिकरणाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी देखील या समारंभाला दूरदृश्य प्रणालीद्वारे हजेरी लावली.

भारत सरकारच्या "उडे देश का आम नागरीक "या अंतर्गत प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजनेद्वारे (RCS-UDAN) बरेली येथील विमानतळाचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे.

उडान योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 325 मार्ग, 5 हेलिपोर्ट, 56 विमानतळ आणि 2 जल विमानस्थानके कार्यान्वित करण्यात आले आहेत.

Flight No

Departure

Arrival

Flight 9I701

08:55

10:00

Flight 9I702

10:25

11:25

 

S.Tupe/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1703291) Visitor Counter : 249