पर्यटन मंत्रालय

पर्यटन क्षेत्र स्थानिक समुदायांना विशेषत: महिला उद्योजकांना आर्थिक संधी पुरवते


पर्यटन मंत्रालयाने 'देखो अपना देश' अभियानांतर्गत “सेवा आणि एअरबीएनबी इंडियाच्या मदतीने ग्रामीण भारताचा विकास ” या विषयावर वेबिनार आयोजित केले

“पर्यटन क्षेत्रातील महिला या क्षेत्रात कायापालट करू शकतात”

Posted On: 08 MAR 2021 2:37PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 मार्च 2021

पर्यटन मंत्रालयाच्या देखो अपना देश वेबिनार  मालिकेअंतर्गत सेवा आणि एअरबीएनबी इंडियाच्या मदतीने ग्रामीण भारताचा विकास या विषयावर 79वे  वेबिनार 6 मार्च 2021 रोजी आयोजित करण्यात आले होते. 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन असल्यामुळे हा विषय पर्यटन क्षेत्रातील महिलांचे  सामर्थ्य सर्वांसमोर आणण्यासाठी तसेच या क्षेत्रात अस्तित्त्वात असलेल्या संधीची ओळख करून देण्यासाठी उपयुक्त होता.

पर्यटन क्षेत्र सध्या भारतातील सर्व रोजगारांच्या 12.95 टक्के प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार  पुरवते. साहसी पर्यटनाला पर्यटकांची वाढती पसंती पाहता स्थानिक समुदाय विशेषत: महिला उद्योजकांसाठी अपार आर्थिक संधी उपलब्ध आहेत. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्याला समर्थन देऊन त्यांना सक्षम बनवल्यामुळे  उत्पन्न तर मिळतेच शिवाय सामाजिक परिवर्तनासाठी मजबूत इंजिन देखील निर्माण करते. वेबिनारमध्ये  तंत्रज्ञान, तांत्रिक प्रशिक्षण, सूक्ष्म वित्त पुरवठा यांचा वापर करून विविध उपक्रमांच्या माध्यमातून अनौपचारिक अर्थव्यवस्थेमधील  स्वयंरोजगार मिळवणाऱ्या महिलांचे  जीवनमान सुधारून महिलांना सक्षम कारण्याबाबत चर्चा झाली.

वस्त्रोद्योग क्षेत्रात महिला सबलीकरणासाठी सेवा अर्थात सेल्फ एम्प्लायर्ड वुमेन्स असोसिएशन (SEWA) ची स्थापना 1972 मध्ये झाली.  सेवा ही असंघटित क्षेत्रातील महिला कामगारांची एकमेव राष्ट्रीय संघटना आहे जिचे भारतात 18 राज्यांत 1लाखांहून अधिक सभासद आहेत . आज सेवाचे 35 टक्के सभासद तरुण पिढीतील आहेत.  सेवाने काही वर्षांपूर्वी पर्यटन क्षेत्रात प्रवेश केला असून गुजरातमध्ये यशस्वी ठरत आहे.

पब्लिक पॉलिसी इंडियाच्या प्रमुख विनीता दीक्षित आणि सेवा चे तंत्रज्ञान प्रमुख तेजसभाई रावल यांनी वेबिनार सादर केले. त्यांनी SEWA आणि Airbnb मधील भागीदारीचा प्रवास आणि दोन्ही भागीदारांना याचा कसा फायदा झाला याचा अनुभव सांगितला. सेवा मधील दोन सर्वात यशस्वी आणि सर्वात जुन्या सदस्यांपैकी, गौरीबेन आणि मीताबेन यांनी अतिथी पर्यटकांना सुविधा पुरवण्याबाबत अनुभव सांगितले. यामुळे केवळ आर्थिकच नव्हे तर तंत्रज्ञान आणि नवीन ज्ञान जाणून घेण्यात कसा फायदा झाला याची माहिती दिली. गौरीबेन म्हणाल्या की त्यांनी फक्त स्वत: साठी पैसे कमवले नाही तर त्यांच्या पतीसह संपूर्ण कुटुंब या उद्योगात काम करत होते आणि त्यांनी  इतरांनाही रोजगार दिला. हा त्यांच्यासाठी अभिमानाचा क्षण होता. त्यांनी  सर्वांना त्यांच्या होमस्टेला भेट देण्याचे आमंत्रण दिले ते अतिशय  हृदयस्पर्शी होते.

पर्यटन मंत्रालयाच्या अतिरिक्त महासंचालक  रूपिंदर ब्रार यांनी केंद्र  सरकारच्या व्होकल फॉर लोकल उपक्रमावर भर दिला आणि म्हणाल्या की गौरीबेन आणि मीताबेन या दोन सेवा  सदस्यांच्या यशोगाथा ऐकल्यानंतर  इच्छा आहे  तेथे मार्ग आहे याची प्रचिती येते. कोणत्याही अडथळ्याची पर्वा न करता त्यातून मार्ग काढता येऊ शकतो.

 

S.Tupe/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1703165) Visitor Counter : 265