उपराष्ट्रपती कार्यालय
कोविड 19 साथीविरोधातील जागतिक लढाईत भारत लवचिकता, संशोधन आणि नवनिर्मिती यामुळे पथदर्शक ठरला - उपराष्ट्रपती
देशातील सर्वात मोठा सामाजिक सुरक्षा कार्यक्रम चालवण्याबद्दल ईएसआयसी अर्थात कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे चे उपराष्ट्रपतींनी केले कौतुक
फरिदाबाद येथील ईएसआयसी वैद्यकीय महाविद्यालयाच्या पहिल्या पदवीदान दिवसाला केले संबोधित
Posted On:
07 MAR 2021 4:00PM by PIB Mumbai
‘लवचिकता, संशोधन आणि नवनिर्मिती’ यामुळे कोविड 19 साथी विरूद्धच्या जागतिक लढ्यात भारत पथदर्शक ठरू शकला,' असे उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांनी म्हटले आहे. साथीच्या आजारामुळे निर्माण झालेल्या आव्हानांवर तांत्रिक तोडगे शोधल्याबद्दल त्यांनी भारतीय संशोधक आणि वैज्ञानिकांच्या अथक प्रयत्नांचे आणि कल्पकतेचे कौतुक केले.
नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आज आयोजित ईएसआयसी वैद्यकीय महाविद्यालय (फरीदाबाद) च्या पहिल्या पदवीदान दिवस समारंभाला त्यांनी संबोधित केले. देशातील डॉक्टर, वैज्ञानिक आणि धोरणकर्त्यांद्वारे झालेल्या वेळेवर आणि निर्णायक उपायांमुळे विषाणूच्या फैलावाला आळा बसू शकला, असे कौतुक त्यांनी केले. नायडू यांनी, पीपीई किट्स, सर्जिकल ग्लोव्हज, फेस मास्क, व्हेंटिलेटर यासारख्या अत्यावश्यक वस्तूंचेआणि लसीनचे उत्पादन वाढवल्याबद्दल भारतीय उद्योगाचे कौतुक केले.
कोविड -19 साथीविरुद्धच्या लढाईत ईएसआयसीद्वारे चालवल्या जाणाऱ्या वैद्यकीय आणि निम वैद्यकीय संस्थांनी दिलेल्या योगदानाचे कौतुकही उपराष्ट्रपतींनी केले.
विद्यार्थ्यांच्या जीवनात पदवीदान समारंभ हा एक अविस्मरणीय दिवस असल्याचे सांगत नायडू यांनी त्यांना जीवनातील पुढील टप्प्यात सेवेतील वचनबद्धतेसह प्रवेश करण्यास सांगितले.
वैद्यकीय व्यवसायाला सर्वात उदात्त व्यवसाय म्हणून संबोधत उपराष्ट्रपतींनी करुणा व व्यवसायातील नीतिमत्ता व मूल्यांचे पालन करण्याची गरज यावर भर दिला.
आजच्या कार्यक्रमात सर्व पदके मुलींनी जिंकलेली आहेत, याबद्दल उपराष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला. त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि प्रत्येक क्षेत्रात महिलांना समान संधी देण्याची गरज अधोरेखित केली.
कोविड -19 विरुद्ध भारतात सुरू झालेल्या जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेचा उल्लेख उपराष्ट्रपतींनी केला. साथीच्या रोगाचा सर्वात धोकादायक काळ संपला असल्याचे वाटत असले तरी सतर्क राहण्याचे आणि विषाणूचा धोका पूर्णपणे टळेस्तोवर आवश्यक खबरदारी घेत राहण्याचा सल्ला उपराष्ट्रपतींनी दिला.
भारतात संसर्गरहित आजारांच्या (एनसीडी) वाढत्या संख्येबद्दल चिंता व्यक्त करताना, उपराष्ट्रपतींनी या वर्षाच्या आर्थिक सर्वेक्षणातील आकडेवारी सांगितली. देशातील मृत्यूंपैकी 65% मृत्यू या आजारांमुळे झाले आहेत. या आजारांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी सर्व संबंधितांनी ठोस प्रयत्न करण्याचे आवाहन नायडू यांनी केले आणि शहरी भागात खास या आजारांसाठी क्लिनिक स्थापन करावीत, असे ईएसआयसीला सुचवले.
भारतातील आरोग्यावरील खर्चाच्या उच्च दराबद्दल चिंता व्यक्त करून नायडू यांनी सर्वांना परवडणाऱ्य किमतीत दर्जेदार आरोग्यसेवा मिळायला हवी, असे सांगितले.
देशातील सुमारे 10% लोकसंख्येला सुरक्षा पुरवणारा भारतातील सर्वात मोठा सामाजिक सुरक्षा उपक्रम चालवत असल्याबद्दल उपराष्ट्रपतींनी ईएसआयसी अर्थात कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे कौतुक केले. मात्र ग्राहकांना अधिक चांगली सेवा देण्यास , तक्रारीचे निवारण आणि सुधारित परिणाम यात सुधारणा करण्यास वाव असल्याचे त्यांनी सांगितले. कामगार आणि रोजगार मंत्रालयाचे कौतुक केले की प्रत्येक कामगाराचे आरोग्य आणि सुरक्षा, सुनिश्चित करण्यासाठी ईएसआयसीमध्ये महत्तवाच्या सुधारणांचे काम सुरू केल्याबद्दल उपराष्ट्रपतींनी श्रम आणि रोजगार मंत्रालयाचे कौतुक केले.
कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे अनेक नवे उपक्रम आहेत. उदा. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाशी सामंजस्य करार, ज्यात निवडक जिल्ह्यांमधील ईएसआय योजनेचे लाभार्थी आयुष्मान भारत पॅनलवरील रूग्णालयात सेवा मिळवू शकतील. तसेच नाममात्र वापरकर्ता अधिभारासह आपली वापरात नसलेली रुग्णालये सामान्य नागरिकांसाठी खुली करण्याचा ईएसआयसीचा उपक्रम, अशा उपक्रमांचे नायडू यांनी कौतुक केले. अत्याधुनिक सुविधा व अत्यंत कुशल व्यावसायिकांमुळे भारत एक आकर्षक वैद्यकीय पर्यटन केंद्र म्हणून उदयास येत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
केंद्रीय कामगार आणि रोजगार राज्यमंत्री(स्वतंत्र कार्यभार ) संतोष कुमार गंगवार, कामगार आणि रोजगार सचिव अपूर्व चंद्रा , ईएसआयसीच्या महासंचालक अनुराधा प्रसाद, फरीदाबादच्या ईएसआयसी वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन , डॉ. असीम दास, प्राध्यापक आणि विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
***
Jaydevi PS/S.Kakade/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1703005)
Visitor Counter : 197