आयुष मंत्रालय

परिणामकारता वाढवण्याच्या दृष्टीने केंद्रीय आरोग्य योजनांच्या आयुष विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना पदोन्नती

Posted On: 05 MAR 2021 4:43PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 मार्च 2021
 

केंद्रीय आरोग्य योजनांच्या (CGHS) आयुष केंद्राची वाटचाल सुरळीत करण्याच्या प्रयत्नातील महत्वाचा भाग म्हणून आयुष मंत्रालयाने 78 आयुष वैद्यकीय अधिकार्यांना 5 मार्च 2021 पासून वरिष्ठ प्रशासकीय स्तरावरील( SAG) प्रमुख आरोग्य अधिकारी अशी पदोन्नती दिली आहे. या आयुष वैद्यकीय अधिकार्यांपैकी बहुतेकजण आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी व सिद्ध उपचारपद्धतीचे उपचारक असून यातील सर्वाधिक 39 अधिकारी होमिओपॅथी शाखेचे आहेत.

केंद्र सरकारच्या आरोग्य योजनांमधील (CGHS) आयुष केंद्रे, दरवषी जवळपास 6 लाख रुग्णांवर उपचार करत, केंद्र सरकारच्या एकूण आरोग्य योजनांमध्ये महत्वाची भूमिका बजावतात. या योजनेतून उपचार घेणाऱ्यांची  गेल्या काही वर्षात संख्या वाढत आहे. आरोग्यविषयक सर्वसामान्य तक्रारी व निरामय जगण्याच्या दृष्टीने या केंद्रांमध्ये रुग्ण येतात. वरिष्ठ स्तरावर थेट पदोन्नतीमुळे अधिकार्यांना करिअरमध्ये प्रगती अनुभवायला मिळून जास्तीत जास्त मानवीशक्तीच्या उपयोजन होऊन त्या माध्यमाद्वारे केंद्र सरकारी आरोग्य योजनांवर सकारात्मक परिणाम होईल.

या पदोन्नती मिळालेल्या आयुष वैद्यकीय अधिकार्यांच्या पदोन्नती बरेच वर्ष रेंगाळल्या होत्या. जून 2018 मध्ये भरती नियमांतर्गत राबवण्यात आलेल्या DACP योजनेमधील भरतीविषयक नव्या तरतुदींमुळे या पदोन्नती अमलात आणणे शक्य झाले.

केंद्रसरकारी आरोग्य योजनांच्या आयुष केंद्रांमध्ये  सध्या मुलभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याकडे लक्ष पुरवण्यात येत आहे. या केंद्रांची कार्यक्षमता व परिणामकता वाढवण्याच्या उद्देशाने केंद्रांमध्ये क्लाउड तंत्राधारित आयुष आरोग्य व्यवस्थापन माहिती व्यवस्था (A-HMIS) बसवण्याची योजना विचाराधीन आहे. 


* * *

Jaydevi PS/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1702691) Visitor Counter : 178