संरक्षण मंत्रालय

डीआरडीओने सॉलिड फ्युएल डक्टेड रॅमजेटची यशस्वी उड्डाण चाचणी घेतली

Posted On: 05 MAR 2021 4:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 मार्च 2021
 

संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) 5 मार्च 2021  रोजी सकाळी 10. 30  वाजता ओदिशाच्या किनाऱ्यावरील चंडीपूर  एकात्मिक चाचणी रेंज  येथून सॉलिड फ्युएल डक्टेड रॅमजेट (एसएफडीआर) तंत्रज्ञानावर आधारित उड्डाण प्रात्यक्षिके यशस्वीपणे पार पाडली. सर्व उपप्रणाली, बूस्टर  मोटर आणि नोजल-लेस  मोटर यांनी  अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली. चाचणी दरम्यान, सॉलिड इंधन आधारित डक्ट्ट रामजेट तंत्रज्ञानासह  अनेक नवीन तंत्रज्ञान सिद्ध करण्यात आली. 

सॉलिड फ्युएल बेस्ड डक्टेड रॅमजेट तंत्रज्ञानाच्या यशस्वी प्रात्यक्षिकाने  डीआरडीओला तांत्रिक फायदा पुरवला आहे ज्यामुळे ते लांब पल्ल्याची हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणस्त्रे विकसित करू शकेल. सध्या असे तंत्रज्ञान जगातील मोजक्या देशांकडेच उपलब्ध आहे. चाचणी दरम्यान,  बूस्टर मोटर वापरुन हेवी प्रक्षेपण सिम्युलेट करण्यात आले. . त्यानंतर, नोजल-लेस  बूस्टरने रॅमजेट ऑपरेशनसाठी आवश्यक  वेग वाढवला.

आयटीआरने तैनात केलेल्या इलेक्ट्रो ऑप्टिकल, रडार आणि टेलीमेट्री उपकरणांनी हस्तगत केलेल्या डेटाचा वापर करून क्षेपणास्त्राच्या कामगिरीवर देखरेख ठेवण्यात आली. आणि मिशनच्या उद्दीष्टांच्या  यशस्वी प्रात्यक्षिकाची पुष्टी केली. संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळा (डीआरडीएल), रिसर्च सेंटर इमारत  (आरसीआय) आणि हाय एनर्जी मटेरियल रिसर्च लॅबोरेटरी (एचईएमआरएल) यासह विविध डीआरडीओ प्रयोगशाळांच्या ज्येष्ठ शास्त्रज्ञांकडून या प्रक्षेपणावर देखरेख ठेवण्यात आली.

संरक्षण  मंत्री  राजनाथ सिंह यांनी एसएफडीआरच्या यशस्वी उड्डाण चाचणीबद्दल डीआरडीओचे वैज्ञानिक, भारतीय हवाई दल आणि उद्योग यांचे  अभिनंदन केले.

सचिव, संरक्षण संशोधन आणि विकास  विभाग आणि डीआरडीओचे अध्यक्ष  डॉ. जी. सतीश रेड्डी यांनीही यशस्वी उड्डाण चाचणीत सहभागी चमूचे अभिनंदन केले.


* * *

M.Chopade/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1702685) Visitor Counter : 294