शिक्षण मंत्रालय
यूजीसी (संयुक्त आणि दुहेरी पदवी आणि ट्वीनिंग [दुहेरी]) अभ्यासक्रम ठरवण्यासाठी भारतीय आणि परदेशी उच्च शिक्षण संस्था यांच्यात शैक्षणिक सहकार्य) नियम, 2021 च्या मसुद्यावर सूचना आमंत्रित
सूचना प्राप्त करण्याची शेवटची तारीख 15 मार्चपर्यंत वाढविण्यात आली - रमेश पोखरियाल ‘निशंक’
Posted On:
04 MAR 2021 5:38PM by PIB Mumbai
यूजीसीने संयुक्त पदवी आणि दुहेरी पदवी आणि ट्वीनिंग [दुहेरी] अभ्यासक्रम ठरवण्यासाठी भारतीय आणि परदेशी उच्च शिक्षण संस्था यांच्यात शैक्षणिक सहकार्यावरील नियमांचा मसुदा सार्वजनिक डोमेनवर उपलब्ध केला असून सर्व भागधारकांकडून या मसुद्यावर सूचना आमंत्रित केल्या आहेत अशी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी आज दिली. शिक्षण मंत्रालयाने एनईपीच्या या पैलूची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी मंत्र्यांनी सर्व शैक्षणिक आणि इतर सर्व भागधारकांकडून अभिप्राय मागितले आहेत. सूचना / अभिप्राय प्राप्त करण्याची अंतिम तारीख आता 15 मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहितीही मंत्र्यांनी दिली. ugcforeigncollaboration[at]gmail[dot]com वर अभिप्राय पाठवावेत.
भारत सरकार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -2020 च्या अंमलबजावणीसाठी अनेक उपक्रम राबवित आहे. एनईपी-2020 मध्ये परदेशात घेतलेले शिक्षण हे पदवी प्राप्त करण्यासाठी गणले जावे याची परवानगी मागितली आहे. याव्यतिरिक्त, 2021 च्या अर्थसंकल्पात संयुक्त पदवी आणि दुहेरी पदवी आणि ट्वीनिंग [दुहेरी] कार्यक्रमाला परवानगी देणारी नियामक यंत्रणा प्रस्तावित आहे. त्यानुसार यूजीसीने, यूजीसी (संयुक्त आणि दुहेरी पदवी आणि ट्वीनिंग [दुहेरी] कार्यक्रम प्रदान करण्यासाठी भारतीय आणि परदेशी उच्च शिक्षण संस्था यांच्यात शैक्षणिक सहकार्य) नियम, 2021 चा मसुदा तयार केला आहे.
“ट्विनिंग व्यवस्थे” अंतर्गत भारतीय उच्च शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी संबंधित युजीसीच्या नियमांचे पालन करून परदेशी उच्च शिक्षण संस्थेत अंशतः त्यांचा अभ्यासक्रमाचे शिक्षण घेऊ शकतील.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवर मजबूत संपर्क प्रदान करण्यासोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रमासह बहु-अनुशासनात्मक व अंतर्विषयक शिक्षण प्राप्त होईल, रोजगारात सुधारणा होईल, परदेशी विद्यार्थ्यांना भारतात अभ्यास करण्यासाठी आकर्षित केले जाईल आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ठिकाणी भारतीय विद्यापीठांची स्थिती सुधारेल.
यूजीसी (संयुक्त आणि दुहेरी पदवी आणि ट्वीनिंग [दुहेरी] कार्यक्रम प्रदान करण्यासाठी भारतीय आणि परदेशी उच्च शिक्षण संस्था यांच्यात शैक्षणिक सहकार्य) नियम, 2021 चा मसुदा पाहण्यासाठी खाली क्लिक करा:
ugc.ac.in/pdfnews/4258186_Draft-UGC-Academic-Collaboration-with-Foreign-HEIs-Regulations-2021.pdf
****
M.Chopade/S.Mhatre/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1702482)
Visitor Counter : 191