संरक्षण मंत्रालय
भारतीय वायुदल प्रमुखांची श्रीलंकेला भेट
Posted On:
03 MAR 2021 6:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 मार्च 2021
भारतीय वायुदल प्रमुख पीव्हीएसएम एव्हीएसएम व्हीएम एडीसी आर.के.एस.भदोरीया, श्रीलंकेच्या वायुदलाचे प्रमुख सुदर्शन पाठिराना(SLAF) यांच्या निमंत्रणानुसार कोलंबोत दाखल झाले.श्रीलंकेच्या वायुदलाचा दिनांक 02 मार्च 2021 रोजी 70 वा वर्धापन दिन आहे आणि दिनांक 05 मार्च 2021 रोजी या निमित्ताने राष्ट्रपतींसमोर सादरीकरणाचा कार्यक्रम होईल.
त्यांच्या भेटीचा एक भाग म्हणून दिनांक 03 मार्च 2021 रोजी होणाऱ्या उदघाटन समारंभाला भारतीय वायुदल प्रमुख उपस्थित राहतील. यावेळी फ्लायपास्ट आणि हवाई कसरतींचे प्रदर्शन होणार आहे.गँले फेस कोलंबो येथील हवाई प्रदर्शनात सूर्यकिरण आणि सारंग तसेच तेजस एलसीए या भारतीय हवाई दलाच्या तुकडीचा हवाई प्रदर्शनात सहभाग आहे.भारतीय वायुदलाच्या तुकडीचे कोलंबो येथे दिनांक 27 फेब्रुवारी2021 रोजी आगमन झाले.यावेळी ही तसेच गौरवशाली हवाई प्रदर्शन करण्यात येईल जसे दोन दशकांपूर्वी एसएलएएफच्या सुवर्णमहोत्सवी समारंभात आय एएफच्या सूर्यकिरणचे हवाई प्रदर्शन झाले होते.
दोन दिवसांच्या या भेटी दरम्यान भारतीय हवाई दल प्रमुख विविध मान्यवर आणि श्रीलंकेच्या सशस्त्र सेनादलाच्या सेवा प्रमुखांशी चर्चा करणार आहेत. भारतीय वायुदल आणि एसएलएएफ यांच्यात गेली काही वर्षे सातत्याने सहकारी देवाणघेवाण होत आहे आणि मुख्यालयातील वायुदल कर्मचारी जमीन आणि हवेवरून उड्डाण, व्यावसायिक लष्करी शिक्षण, मानवी आपत्कालीन सहाय्य (HADR) आणि सर्वोत्तम परीचालन पध्दत या क्षेत्रातील मौल्यवान अनुभव सामायिक करण्यासाठी नियमितपणे संवाद साधत आहेत. अलीकडच्या काळात दोन्ही देशातील वायुदलांत दोन्ही देशातील सेवा कर्मचाऱ्यांच्या आणि कुटुंबियांच्या भेट देऊन आदानप्रदान करण्याच्या संबंधांत वाढ झाली आहे.
हवाई प्रदर्शनाच्या दिवशीची भारतीय वायुदलाच्या प्रमुखांची उपस्थिती आयएएफ आणि एसएलएएफ यांच्या संबंधांना सामर्थ्य देईल. याशिवाय या भेटीमुळे विद्यमान सहकारी प्रक्रीया मजबूत होईल आणि परस्परांच्या हिताच्या नव्या गोष्टी सामोर येतील.
* * *
M.Chopade/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1702289)
Visitor Counter : 291