संरक्षण मंत्रालय

सहाव्या डेझर्ट फ्लॅग सरावात भारतीय हवाईदलाचा सहभाग

Posted On: 02 MAR 2021 7:42PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 मार्च 2021

डेझर्ट फ्लॅग म्हणजे संयुक्त अरब अमिरातीच्या हवाई दलाद्वारे वार्षिक बहु-राष्ट्रीय भव्य युद्धसराव कार्यक्रम आहे. भारतीय हवाईदल प्रथमच संयुक्त अरब अमिराती, अमेरिका, फ्रान्स, सौदी अरेबिया, दक्षिण कोरिया आणि बहारीनच्या हवाई दलांसह सहाव्या डेझर्ट फ्लॅग सराव कार्यक्रमात सहभागी होत आहे. युएईच्या अल-धफ्रा हवाईतळावर 03 मार्च 21 ते 27 मार्च 21 या कालावधीत हा कार्यक्रम होणार आहे.

सहा एसयू -30 एमकेआय, दोन सी -17 आणि एक आयएल -78 टँकर विमानासह भारतीय हवाईदल सहभागी होत आहे. भारतीय हवाईदलाच्या तुकडीचा समावेश करायला/समावेश न करायला सी -17 ग्लोबमास्टर समर्थन देईल. आयएल-78 टँकर विमानाच्या हवेत इंधन भरण्याच्या सुविधेच्या सहाय्याने एसयू -30 एमकेआय विमान भारतातून थेट सरावाच्या ठिकाणी पोहोचण्याचा लांबचा पल्ला पार करेल. नियंत्रित वातावरणात हवाई युद्धसराव करण्यास प्रशिक्षण देताना सहभागी सैन्याला प्रत्यक्ष कार्यान्वयन अनुभूती प्रदान करणे हे सरावाचे उद्दीष्ट आहे. सहभागी सैन्यांना उत्कृष्ट कार्यपद्धतीची परस्पर देवाणघेवाण करण्यासह त्यांची कार्यरत क्षमता वाढविण्याची संधी मिळेल.

जगभरातील वैविध्यपूर्ण लढाऊ विमानांचा समावेश असलेल्या या भव्य सराव कार्यक्रमात भाग घेणाऱ्या सैन्यासह, भारतीय हवाईदलाला ज्ञान, अनुभव, कार्यान्वयन क्षमता आणि समन्वय वाढविण्याची अनोखी संधी मिळेल. गतिशील आणि वास्तववादी युद्धाच्या वातावरणात सहभागी राष्ट्रांसोबत सराव करणे आणि संवाद साधणे हे देखील आंतरराष्ट्रीय संबंध दृढ करण्यातील योगदान ठरेल.

गेल्या दशकात, भारतीय हवाईदलाने जगातील सर्वोत्तम हवाईदलात सहयोगात्मक सहभाग नोंदवत बहु-राष्ट्रीय युद्धसरावाचे नियमितपणे यजमानपद भूषविले आहे किंवा भाग घेतला आहे.

 

S.Tupe/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1702028) Visitor Counter : 100