वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

भारताची व्यापाराची आकडेवारी: प्राथमिक माहिती, फेब्रुवारी 2021

Posted On: 02 MAR 2021 4:32PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 मार्च 2021

भारताच्या मालाची निर्यात 2021 च्या फेब्रुवारी मध्ये 27.67 अब्ज डॉलर इतकी होती.  फेब्रुवारी 2020 मधील 27.74 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत यात 0.25% घट झाली आहे.

फेब्रुवारी 2021 मध्ये भारताची व्यापारी आयात 40.55 अब्ज डॉलर्स होती.  फेब्रुवारी 2020 च्या 37.90 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत, आयात 6.98 टक्क्यांनी वाढली आहे.

फेब्रुवारी 2021 मध्ये भारताची व्यापारी तूट 12.88 अब्ज डॉलर्स इतकी होती, फेब्रुवारी 2020 मध्ये व्यापारी तूट 10.16 अब्ज डॉलर्स इतकी होती. दोहोंमधे तुलना केली असता व्यापारी तूट 26.74 टक्क्यांनी वाढली आहे.

फेब्रुवारी 2021 मध्ये भारताची व्यापारी निर्यात 27.67 अब्ज डॉलर होती, फेब्रुवारी 2020 च्या 27.74 अब्ज डॉलरच्या तुलनेत ती 0.25  टक्क्यांनी कमी आहे. एप्रिल ते फेब्रुवारी 2020-21 दरम्यान निर्यात 255.92 अब्ज डॉलर्स होती, तर मागील याच काळात ती 291.87 अब्ज डॉलर्स होती.  याकाळात निर्यातीत 12.32% घट झाल्याचे दिसते.

भारताची आयात फेब्रुवारी 2021 मध्ये 40.55 अब्ज डॉलर्स होती. फेब्रुवारी 2020 मध्ये भारताची व्यापारी आयात 30.90  अब्ज डॉलर्स होती, दोहोंची तुलना करता यात 6.98 टक्के वाढ झाली आहे.  एप्रिल ते फेब्रुवारी 2020-21 दरम्यान माल आयात 340.88 अब्ज डॉलर्स होती, जी मागील वर्षाच्या याच कालावधीत 443.24 अब्ज डॉलर्स होती, जी  23.09% टक्के नकारात्मक वाढ दर्शवित आहे.

फेब्रुवारी 2021 मध्ये व्यापारी तूट 12.88 अब्ज डॉलर्स इतकी होती, त्या तुलनेत फेब्रुवारी 2020 मध्ये व्यापार तूट 10.16 अब्ज डॉलर्स इतकी होती, याकाळात व्यापारी तूटीत 26.74 टक्क्यांनी वाढ झाली.

फेब्रुवारी 2021 मध्ये बिगर पेट्रोलियम निर्यातीचे मूल्य 25.16 अब्ज डॉलर्स होतेफेब्रुवारी 2020 च्या तुलनेत ते  3.55 टक्क्यांनी वाढले आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये बिगर पेट्रोलियम आणि बिगर रत्ने व दागिन्यांच्या निर्यातीचे मूल्य 22.48 अब्ज डॉलर्स होते. 2020 च्या फेब्रुवारीच्या 21.28 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत यात वाढ झाली असून ही वाढ 5.65 टक्के आहे.

एप्रिल-फेब्रुवारी 2020-21 मध्ये बिगर पेट्रोलियम आणि रत्ने आणि आभूषणे निर्यातीचे संचयीक मूल्य 211.25 अब्ज डॉलर्स होते, तर 2019-20 मध्ये याच कालावधीत 219.22 अब्ज डॉलर्स होते. तुलना केली असता यात 3.63 टक्के घट झाली आहे.

फेब्रुवारी 2021 मध्ये तेलाची आयात 8.99 अब्ज डॉलर्स होती, तर फेब्रुवारी 2020 मध्ये 10.78 अब्ज डॉलर्स होती, त्या तुलनेत 16.63% घट झाली आहे.  एप्रिल ते फेब्रुवारी 2020-2021 मध्ये तेल आयात 72.08 अब्ज डॉलर्स होती, आधीच्या 120.50 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत 40.18 टक्के घट झाली आहे.

फेब्रुवारी 2020 मध्ये बिगर तेल आयात 31.56 अब्ज डॉलर्स एवढी होतीफेब्रुवारी 2020 मधल्या 27.12 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत 16.37 टक्के वाढ झाली .  एप्रिल ते फेब्रुवारी 2020-2021 मध्ये बिगर तेल आयात 268.78 अब्ज डॉलर्स होती, जी गेल्या वर्षी याच कालावधीत 322.74 अब्ज डॉलर्स होती. या तुलनेत त्यात 16.73 टक्के घसरण झाली.

फेब्रुवारी 2021 मध्ये बिगर तेल, नॉन-जीजे (सोने, चांदी आणि मौल्यवान धातू) आयात 23.85 अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे. 2020 च्या 22.21 अब्ज डॉलरच्या तुलनेत ही वाढ 7.40 टक्के आहे.  एप्रिल-फेब्रुवारी 2020-21 मध्ये बिगर तेल आणि नॉन-जीजे आयात 225.40 अब्ज डॉलर्स होती, एप्रिल ते फेब्रुवारी 2019-2020 मध्ये ती 272.05 अब्ज डॉलर्स होती, त्या तुलनेत 17.11 टक्के नकारात्मक वाढ नोंदली गेली. 

MERCHANDISE TRADE: Preliminary Data, February 2021

Summary Value in USD Billion

 

Total

Non-Petroleum

Non- Petroleum and Non-Gems &Jewellery

 

2019-20

2020-21

% change

2019-20

2020-21

% change

2019-20

2020-21

% change

Exports

27.74

27.67

-0.25

24.30

25.16

3.55

21.28

22.48

5.65

Imports

37.90

40.55

6.98

27.12

31.56

16.37

22.21

23.85

7.40

Deficit

-10.16

-12.88

26.74

-2.82

-6.40

126.65

-0.93

-1.37

47.41

                     

 

Change by top Commodity Groups

Value in USD Million

 

Top Increase in February 2021 as compared to February 2020
 

Top Decline in February 2021 as compared to February 2020
 

 

Commodity group

Change in value

% change

Commodity group

Change in value

% change

Export

IRON ORE

294.09

167.79

PETROLEUM PRODUCTS

-933.82

-27.13

DRUGS AND PHARMACEUTICALS

254.55

14.58

GEMS AND JEWELLERY

-337.64

-11.18

RICE

210.29

30.10

ENGINEERING GOODS

-185.01

-2.56

Import

GOLD

2928.20

123.95

PETROLEUM, CRUDE & PRODUCTS

-1792.43

-16.63

ELECTRONIC GOODS

1326.97

37.77

COAL, COKE & BRIQUETTES, ETC.

-514.85

-28.09

ORGANIC & INORGANIC CHEMICALS

559.09

37.61

TRANSPORT EQUIPMENT

-505.45

-23.00

M.Chopade/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1701972) Visitor Counter : 2736
Read this release in: English , Urdu , Hindi , Manipuri