नौवहन मंत्रालय
मेरीटाईम इंडिया समिट -2021 चे पंतप्रधानाच्या हस्ते आभासी पद्धतीने उद्घाटन
100 पेक्षा जास्त देशांतील 1.7 लाखांहून अधिक नोंदणीकृत सहभागींनी सहभाग घेतलेली ही जगातील सर्वात मोठी आभासी शिखर बैठक आहे: मनसुख मांडवीय
प्रविष्टि तिथि:
02 MAR 2021 3:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 मार्च 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ‘मेरीटाइम इंडिया समिट 2021’ चे उद्घाटन केले. डेन्मार्कचे परिवहन मंत्री बेनी एंगलेब्रेक्ट, गुजरात आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि केंद्रीय बंदर, नौवहन व जलमार्ग राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) मनसुख मांडवीय यावेळी उपस्थित होते.

मेरीटाइम इंडिया समिट जगातील सर्वात मोठी आभासी शिखर परिषद आहे, ज्यामध्ये 100 हून अधिक देशांमधील 1.7 लाखाहून अधिकजण सहभागी झाले आहेत. या तीन दिवसांच्या शिखर परिषदेत 8 देशांचे मंत्री, 50 हून अधिक जागतिक विशेष कार्यकारी अधिकारी आणि 24 देशातील 115 आंतरराष्ट्रीय वक्त्यांसह 160 हून अधिक वक्ते असतील अशी माहिती आपल्या स्वागतपर भाषणात मनसुख मांडवीय यांनी दिली.

सागरी क्षेत्रात गुंतवणूक सुलभ करण्यासाठी आणि पायाभूत सुविधांसाठी तसेच आत्मनिर्भर भारताच्या दृष्टिकोनातून भूमिका पार पाडण्यासाठी भारत सरकार सर्वतोपरी तयारी दर्शवित आहे असे आश्वासन मांडवीय यांनी या क्षेत्रातील सर्व हितधारक आणि जगभरातील गुंतवणूकदारांना दिले.
कार्यक्रमाची व्हिडिओ लिंक पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://youtu.be/t46PPbw3YGc
M.Chopade/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1701938)
आगंतुक पटल : 271