विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
प्राध्यापक के विजय राघवन यांनी ज्ञान निर्मितीच्या संधी वाढवणे आवश्यक असल्याचे अधोरेखित केले
Posted On:
02 MAR 2021 3:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 मार्च 2021
ज्ञान निर्मितीच्या संधी वाढवणे आणि ज्ञान आणि समाज यांच्यातील दरी कमी करणे तसेच मोठ्या आकडेवारीचे विश्लेषण करण्यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढवणे हे उपाय भारताला विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवसंशोधनात जागतिक नेतृत्व बनवू शकतात, असे केंद्र सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार प्राध्यापक के. विजय राघवन यांनी अधोरेखित केले. वाडिया हिमालयन भूविज्ञान संस्थेने (डब्ल्यूआयएचजी) राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.


विज्ञान आणि तंत्रज्ञानामधील मानवी हस्तक्षेपाचा खोलवर परिणाम होतो आणि सध्याची गरज शिक्षण आधारित स्वावलंबी संघटनात्मक समाज बनण्याची आहे, असे प्राध्यापक विजय राघवन यांनी सांगितले.
तंत्रज्ञान प्रणित जगातील भू-विज्ञानांच्या भूमिकेवर भर देताना ते म्हणाले की हिमालयाने जागतिक पातळीवर मानवी सभ्यतेला आकार दिला आणि त्या पार्श्वभूमीवर वाडिया हिमालयन भूविज्ञान संस्थेची भूमिका महत्वाची आहे.


वाडिया संस्थेचे संचालक प्रा. कलाचंद सैन यांनी उपस्थितांना वक्त्यांच्या विस्तृत कौशल्याची आणि त्यांनी देशाला मिळवून दिलेल्या गौरवांची ओळख करून दिली. या कार्यक्रमात शास्त्रज्ञ, विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रत्यक्ष आणि ऑनलाइन माध्यमातून सहभागी झाले होते.
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय धातु विज्ञान आणि नवीन सामग्री प्रगत संशोधन केंद्र (एआरसीआय) येथे झालेल्या दुसर्या कार्यक्रमात, संपूर्ण भारतभरातील काही प्रमुख संस्थांमधील अभ्यासकांनी थ्रीडी प्रिंटिंग, अॅलोय डिझाइन, जलशुद्धीकरण, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवीकरणीय ऊर्जा, स्मार्ट मटेरियल इत्यादी विषयांवर चर्चा केली.
यावेळी बोलताना एआरसीआयचे संचालक डॉ. जी. पद्मनाभम यांनी ऊर्जा, आरोग्य, पर्यावरण, प्रगत उत्पादन यासारख्या सामाजिकदृष्ट्या संबंधित क्षेत्रात संशोधन केल्याबद्दल तरुण शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. त्यांनी तरुण संशोधकांना वैज्ञानिक जिज्ञासा समजून घेण्याबरोबरच ते जिथे राहतात त्या सामाजिक परिस्थिती बाबत देखील उत्सुकता वाढवण्यास उद्युक्त केले. वेगवेगळ्या विज्ञान शाखेमध्ये उत्तम विज्ञान घडत असल्याचे नमूद करताना, त्यांनी तरुण संशोधकांमध्ये परस्परसंवादाचे महत्त्व अधोरेखित केले.
एआरसीआयच्या संपर्क उपक्रमाचा एक भाग म्हणून, डॉ. पद्मनाभम यांनी एआरसीआय तंत्रज्ञानाच्या घडामोडींवर आधारित ‘विद्यार्थ्यांसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिक व्हिडिओ प्रकाशित केले.



U.Ujgare/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1701937)
Visitor Counter : 202