गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने स्वच्छ सर्वेक्षण 2021 च्या क्षेत्र मूल्यांकनाला केली सुरुवात

Posted On: 01 MAR 2021 4:56PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांनी आज नवी दिल्ली इथे झालेल्या वेब कार्यक्रमात स्वच्छ सर्वेक्षण कार्यक्रमाच्या सहाव्या सत्राच्या म्हणजे  2021 या वर्षीच्या क्षेत्र मुल्यांकनाला सुरुवात केली. स्वच्छ सर्वेक्षण हा शहरी भागातील स्वच्छतेचा दर्जा सुधारण्यासाठी नागरिकांना मोठ्या प्रमाणात सक्रीय सहभाग घेण्यास प्रोत्साहित करून शहरांना उत्तेजन देण्याच्या उद्देशाने भारत सरकारने 2016 मध्ये सुरु केलेला वार्षिक स्वच्छता सर्वेक्षण कार्यक्रम आहे.

या वेबिनारमध्ये बोलताना दुर्गा शंकर मिश्रा म्हणाले की, भारतातील छोटी नगरे तसेच मोठी शहरे यांच्यात स्वच्छता सर्वेक्षणामुळे निकोप स्पर्धेची भावना वाढीस लागली आहे. 2016 साली फक्त 73 शहरांमधील सुमारे दहा लाख लोकसंख्येच्या सहभागाने सुरु झालेला हा उपक्रम आता कित्येक पटीने वाढला असून 2017  साली यात 434 शहरांनी भाग घेतला तर 2018 मध्ये 4,203 शहरांचा यात समावेश झाला. त्याच धर्तीवर 2019 मध्ये 4,237 आणि 2020 मध्ये 4,242 शहरांमध्ये स्वच्छ सर्वेक्षण कार्यक्रम राबविला गेला. यामध्ये 62 छावणी क्षेत्रांचाही समावेश होतो. या वर्षीचा स्वच्छता सर्वेक्षण कार्यक्रम राबविण्यासाठी 2,000 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांच्या मदतीने शहरांच्या स्वच्छताविषयक दर्जाचे मूल्यमापन करण्यासाठीचा हा उपक्रम आज सुरु होत असल्याची घोषणा करताना आम्हांला अत्यंत आनंद होत आहे.

दरवर्षी,4 ते 31 जानेवारी या कालावधीत स्वच्छता सर्वेक्षण कार्यक्रमासाठी प्रत्यक्ष क्षेत्रांवर जाऊन मूल्यांकनाचे काम होत असते. मात्र कोविड – 19 महामारीमुळे या वर्षी या उपक्रमाला विलंब झाला असून आता 1 ते 28 मार्च या कालावधीत मूल्यांकनाचे काम होणार आहे.

***

M.Chopade/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1701710) Visitor Counter : 309