माहिती आणि प्रसारण मंत्रालय
जयदीप भटनागर यांनी पत्र सूचना कार्यालयाच्या प्रधान महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारला
Posted On:
01 MAR 2021 4:22PM by PIB Mumbai
जयदीप भटनागर यांनी आज पत्र सूचना कार्यालयाच्या प्रधान महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारला.

भटनागर हे भारतीय माहिती सेवेच्या 1986 च्या तुकडीचे अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी दूरदर्शनच्या वाणिज्यिक, विक्री आणि विपणन विभागाचे प्रमुख म्हणून दूरदर्शनच्या वृत्तविभागात काम केले आहे.
त्यांनी पश्चिम आशियाच्या वीस देशांसाठी प्रसार भारतीचे विशेष प्रतिनिधी म्हणून काम केले आहे. नंतर त्यांनी आकाशवाणी, वृत्तसेवा विभागाचे प्रमुख म्हणून देखील काम पाहिले आहे.
पत्र सूचना कार्यालयाचे प्रमुख म्हणून काम सुरू करण्यापूर्वी भटनागर यांनी सहा वर्ष पीआयबीच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये काम केले आहे.
भटनागर यांनी 28 फेब्रुवारी 2021 रोजी कुलदीप सिंग धतवालिया यांच्याकडून पदभार स्वीकारला.
***
M.Chopade/S.Mhatre/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1701699)
Read this release in:
Punjabi
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam