अर्थ मंत्रालय
आर्थिक वर्ष 2019-20 यासाठी जीएसटीआर-9 आणि जीएसटीआर-9 सी भरण्याची तारीख दिनांक 30.03.2021पर्यंत वाढविली आहे
प्रविष्टि तिथि:
28 FEB 2021 9:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी 2021
जीएसटीआर-9 आणि जीएसटीआर-9 सी वार्षिक परतावा भरण्यासाठी सीजीएसटी कायद्याच्या 44 कलमा अंतर्गत सीजीएसटी अधिनियम 80 नुसार आर्थिक वर्ष 2019-20 यासाठी परतावा भरण्याची तारीख जी 31.12.2020 ते 28.02.2021 पर्यंत वाढविली होती, जी अधिसूचना 95/2020 सेंट्रल टॅक्स नुसार 30.12.2020 ही केली होती. करदात्यांनी या मुदतीपर्यंत परतावा भरण्यासाठी असमर्थता दर्शविल्यामुळे सरकारने निवडणूक आयोगाकडून परवानगी घेऊन आर्थिक वर्ष 2019-20 यासाठी जीएसटीआर-9 आणि जीएसटीआर-9 सी भरण्याची तारीख दिनांक 30.03.2021पर्यंत वाढविली आहे. ही सूचना करदात्यांना माहिती देण्यासाठी जारी करण्यात येत असून त्यांनी त्या नुसार आपला परतावा भरावा. हा निर्णय परीणामकारक रीतीने जारी करण्यासाठी सुयोग्य अधिसूचना जारी करण्यात येईल.
* * *
Jaydevi PS/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1701574)
आगंतुक पटल : 275