सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
खादी-ग्रामोद्योग ई-मार्केट पोर्टलचा विक्रीचा नवा उच्चांक, स्वदेशी उत्पादनांना मोठे पाठबळ
Posted On:
27 FEB 2021 5:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी 2021
खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने सुरु केलेल्या ऑनलाईन पोर्टलला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे.याचा पुरावा म्हणजे, www.khadiindia.gov.in. हे पोर्टल सुरु झाल्यानंतर अवघ्या आठ महिन्यात, यावरून 1.12 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.
सात जुलै 2020 साली खादी ई पोर्टल सुरु झाले, तेव्हापासून 10,000 पेक्षा जास्त ग्राहकांनी यावरून उत्पादने मागवलीत आणि 65,000 लोकांनी आजवर या पोर्टलला भेट दिली आहे. KVIC ने एक लाखांपेक्षा अधिक वस्तू ग्राहकांपर्यंत पोचवल्या आहेत. या काळात सरासरी ऑनलाईन विक्री प्रती व्यक्ती 11,000 एवढी असल्याचे नोंदले गेले असून खादी आणि इतर उत्पादनांची लोकप्रियता देशात सातत्याने वाढत असल्याचेच हे निदर्शक आहे.
खादी-ई पोर्टल-महत्वाची आकडेवारी (26.02.2021 पर्यंतची आकडेवारी)
खादी-ई पोर्टलची सुरुवात
|
7th July 2020
|
आठ महिन्यातील एकूण विक्री
|
Rs 1.12 crore
|
आठ महिन्यांत मिळालेल्या एकूण ऑर्डर्स
|
10,100
|
ई पोर्टलला भेट देणाऱ्यांची संख्या
|
65,000
|
प्रती ग्राहक-सरासरी विक्री
|
Rs 11,000
|
ऑर्डर नुसार पाठवण्यात आलेल्या उत्पादनांची संख्या
|
1,00,600
|
प्रति ऑर्डर-सरासरी उत्पादनांची संख्या
|
10
|
ऑनलाईन बाजारातील एकूण उत्पादनांची संख्या
|
800
|
सर्वोच्च व्यक्तिगत विक्री मूल्य
|
Rs 1.25 lakh
|
सर्वाधिक ऑर्डर्स गेल्या -
|
Maharashtra (1785) Delhi (1584)
UP (1281)
|
ऑनलाईन वरील सर्वोत्तम विक्रीचे उत्पादन
|
Khadi Masks, honey, herbal soaps, grocery, spices, fabric, Agarbatti
|
केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनीही खादी-ग्रामोद्योग आयोगाच्या ई-कॉमर्स उपक्रमाचे कौतुक केले आहे. यामुळे खादी ग्रामोद्योगांना मोठे विक्री व्यासपीठ मिळाले, असे ते म्हणाले. या बाजारपेठेची वर्षिक उलाढाल 200 कोटीं पर्यंत पोहचेल, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
KVIC ने एकही रुपया खर्च न करता हे ऑनलाईन विक्री पोर्टल सुरु केले होते अतिशय सुटसुटीत अशा या पोर्टलवर उत्पादनांची संपूर्ण आणि योग्य माहिती, विनासायास वस्तू घरी मिळण्याची व्यवस्था यामुळे या पोर्टलला लोकांचा लगेच प्रतिसाद मिळाला.
KVIC चे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना यांनी सांगितले की खादी ई-पोर्टल चालवण्याचा सर्व खर्च KVIC करते. मात्र,ई कॉमर्स साईटवरच्या सगळ्या उत्पादनांची जबाबदारी त्या त्या विक्रेत्याची असते यामुळे पैशांची बचत होते. आज लाखो कारागीर, खादी उत्पादक या पोर्टलचा भाग असून या उपक्रमाशी जोडले गेले आहेत, असे त्यांनी सांगितले.
खादी ऑनलाईन विक्री कोविड काळात केवळ मास्कविक्रीपासून सुरु झाली होती, मात्र आता एक मोठे ई-पोर्टल विकसित करण्यात आले असून त्यावर सुमारे 800 उत्पादने आहेत. यात कपड्यांपासून ते खाद्यपदार्थ, सौंदर्यप्रसाधने, अशा विविध उत्पादनांचा समावेश आहे.
त्याशिवाय, खादी पादत्राणे, खादी नैसर्गिक पेंट आणि वारसा वस्तू असलेले मोन्पा हँडमेड पेपर अशा वैशिष्ट्यपूर्ण वस्तूही या पोर्टलवर आहेत.
KVIC ला 31 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातून मालाच्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत.
* * *
S.Tupe/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1701353)
Visitor Counter : 493