रेल्वे मंत्रालय

टनकपूर-दिल्ली- टनकपूर पूर्णगिरी जन शताब्दी एक्स्प्रेस विशेष रेल्वेला पीयूष गोयल यांनी आभासी माध्यमातून दाखविला हिरवा झेंडा


ही रेल्वे तनकपूरला राजधानीशी जोडेल आणि उत्तराखंडमध्ये होणार सामाजिक आर्थिक विकास

सुधारित दळणवळण साधनांमुळे पूर्णगिरी देवस्थानला येणाऱ्या यात्रेकरूंना फायदेशीर

Posted On: 26 FEB 2021 5:33PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी 2021

 

केंद्रीय रेल्वे, वाणिज्य आणि उद्योग आणि ग्राहक कल्याण, अन्न आणि पुरवठा मंत्री पीयूष गोयल यांनी टनकपूर-दिल्ली जंक्शन विशेष रेल्वेचे आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उद्‌घाटन केले आणि रेल्वेला हिरवा झेंडा दाखविला. यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक आणि अन्य मान्यवर कार्यक्रमस्थळी उपस्थित होते.

या समारंभप्रसंगी बोलताना मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, पुर्णगिरी जनशताब्दी रेल्वेमधील नवीन आधुनिक, सुरक्षित, एलएचबी पद्धतीची आसनव्यवस्था सुरू केल्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल आणि या प्रांतातील दळणवळण देखील वाढेल. मंत्र्यांनी अशीही माहिती दिली की, पिलिभीत- दिल्ली मार्गाचे विद्युतीकरण आगोदरच पूर्ण झाले आह, टनकपूर - पिलिभीत मार्ग देखील पूर्ण झाला आहे, केवळ सीआरएस कडून त्याचे परीक्षण होणे बाकी आहे, लवकरच पूर्ण मार्ग (टनकपूर- दिल्ली) हा पूर्णपणे विद्युतीकरण झालेला असेल. उत्तराखंड राज्यामध्ये सध्या सुरू असलेल्या विविध रेल्वे प्रकल्पांची माहिती त्यांनी यावेळी दिली. अर्थसंकल्पातील रेल्वे प्रकल्पांसाठीची तरतूद अनेक पटींनी वाढविण्यात आली आहे. उत्तराखंड हा विकासाच्या नव्या लाटेचा साक्षीदार असेल.

ही रेल्वे टनकपूर आणि राष्ट्रीय राजधानी यांना जोडली जाईल आणि त्यामुळे या प्रदेशामध्ये सामाजिक आर्थिक विकास साधला जाईल. पूर्णगिरी देवस्थानला भेट देण्यासाठी येणाऱ्या यात्रेकरूंना या सुधारित दळणवळण पद्धतीमुळे खूप फायदा होणार आहे.

रेल्वेबाबत अधिक माहिती-

रोज धावणारी रेल्वे क्रमांक 05325 ही टनकपूर- दिल्ली पूर्णगिरी जन शताब्दी एक्स्प्रेस विशेष रेल्वे टनकपूर येथून 11.25 वाजता निघेल आणि दिल्ली जंक्शन येथे 21.35 वाजता पोहोचेल.

रेल्वे क्रमांक 05326 ही दिल्ली जंक्शन- टनकपूर पूर्णगिरी जन शताब्दी एक्स्प्रेस ही दिल्ली येथून 06.10 वाजता निघेल आणि टनकपूर येथे 16.10 वाजता पोहोचेल.

या रेल्वेमध्ये एकूण 12 एलएचबी पद्धतीची आसनव्यवस्था आहे ज्यामध्ये 2 एसी चेअरकार, 08 चेअर कार आसनव्यवस्था आणि 2 जनरेटर आसनव्यवस्था आहे. बनबासा, खातिमा, पिलिभीत, इज्जतनगर, बरेली शहर, बरेली जंक्शन, विशारतगंज, आँवला, करेनगी, दफ्तरा, असफपूर, चांदूसी, राजा का साहसपूर, मरोदाबाद, अमरोहा, गजरौला, ग्रहमुक्तेश्वर, सिम्भौली, हरपूर, पिलाखुआ, गाझियाबाद, साहिबाबाद, दिल्ली शहदरा ही स्थानके दोन्ही मार्गांवर असतील.   

आज ही रेल्वे द्‌घाटन विशेष रेल्वे म्हणून धावत आहे.

 

S.Thakur/S.Shaikh/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1701126) Visitor Counter : 167