संरक्षण मंत्रालय
संयुक्त वक्तव्य
Posted On:
25 FEB 2021 7:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी 2021
भारत आणि पाकिस्तान यांच्या लष्करी मोहीम महासंचालकांनी हॉट लाईन यंत्रणेद्वारे चर्चा केली. दोन्ही बाजूनी नियंत्रण रेषा आणि इतर क्षेत्राचा खुल्या आणि मोकळ्या आणि सौहार्दपूर्ण वातावरणात आढावा घेतला.
सीमेवर परस्पर लाभदायी आणि कायम स्वरूपी शांतता राहण्याच्या दृष्टीने, ही शांतता भंग करणाऱ्या मुद्यांवर चर्चा करण्याला दोन्ही महासंचालकांनी सहमती दर्शवली. सर्व करारांचे काटेकोर पालन आणि 24/25 फेब्रुवारी 2021 च्या मध्यरात्रीपासून नियंत्रण रेषेवर आणि इतर सर्व क्षेत्रात शस्त्र संधीचे पालन करण्याला दोन्ही बाजूनी सहमती दर्शवली.
कोणताही गैरसमज किंवा आकस्मिक परीस्थितीबाबत तोडगा काढण्यासाठी सध्याच्या हॉट लाईन संपर्क यंत्रणेचा उपयोग करण्याचा पुनरुच्चार दोन्ही बाजूनी केला.
* * *
M.Chopade/N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1700901)
Visitor Counter : 312