संरक्षण मंत्रालय

भारत-अमेरिका कार्यकारी सुकाणू गटाची (ईएसजी) 24 वी बैठक संपन्न

Posted On: 25 FEB 2021 7:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 फेब्रुवारी 2021 


भारत-अमेरिका  कार्यकारी सुकाणू गटाची (ईएसजी) 24 वी  बैठक 22 ते 24 फेब्रुवारी 2021 दरम्यान  नवी दिल्ली येथे झाली. या बैठकीला अमेरिकी  लष्कराचे 12 सदस्यीय  शिष्टमंडळ व्यक्तिशः उपस्थित होते तर वेगवेगळ्या ठिकाणांहून 40 अधिकारी व्हर्च्युअली उपस्थित होते.

अमेरिकी लष्कर पॅसिफिक (यूएसएआरपीएसी) चे डेप्युटी कमांडिंग जनरल मेजर जनरल डॅनियल मॅकडेनियल यांनी अमेरिकी शिष्टमंडळाचे नेतृत्व केले.  भारतीय लष्कराच्या शिष्टमंडळात  37 अधिकारी होते.

दरवर्षी या मंचावर  भारत आणि अमेरिका  लष्करी  सहकार्याबद्दल चर्चा करण्यासाठी एकत्र येतात.

विविध क्षेत्रांमधील गुंतवणूक वाढविण्याच्या उद्देशाने परस्पर हिताच्या अनेक समकालीन मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली. कोविड-19  च्या निर्बंधामुळे प्रथमच ही बैठक प्रत्यक्ष आणि व्हर्चुअल स्वरूपात झाली.

संरक्षण सहकार्याशी संबंधित मुद्दे  आणि सामायिक हिताच्या मुद्द्यांवरही या बैठकीत  चर्चा झाली. 


* * *

Jaydevi PS/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1700891) Visitor Counter : 233