शिक्षण मंत्रालय
केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांचे 16 व्या फिक्की उच्च शिक्षण शिखर परिषद 2021 मध्ये बीजभाषण
Posted On:
25 FEB 2021 6:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी 2021
केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी आज 16 व्या फिक्की उच्च शिक्षण शिखर परिषद 2021 मध्ये उद्घाटनपर भाषण केले. शिक्षण आणि वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या सहकार्याने फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या वतीने 16 व्या फिक्की उच्च शिक्षण शिखर परिषदेचे व्हर्चुअल आयोजन केले जात आहे. शिखर परिषदेची संकल्पना ‘‘उच्च शिक्षण @ 2030: R.I.S.E. – लवचिकता, नाविन्यपूर्ण संशोधन, शाश्वत उद्यम अशी आहे
यावेळी बोलताना पोखरियाल म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये 21 व्या शतकाच्या गरजांना अनुकूल असे भारतीय शैक्षणिक व्यवस्थेत परिवर्तन घडवण्याचा मार्ग आहे. ते पुढे म्हणाले की, सरकारने धोरण तयार केले आहे, मात्र ते अंमलात आणण्यात खासगी क्षेत्राचा सहभाग महत्वाचा असणार आहे.
पोखरियाल म्हणाले, “सुगम्य, समानता, गुणवत्ता, किफायतशीर आणि जबाबदारी या मूलभूत स्तंभांवर आधारित एनईपी 2020 हे शाश्वत विकासासाठी 2030 च्या कार्यक्रमाशी अनुरूप आहे आणि भारताला ज्ञान समाज आणि जागतिक ज्ञान महासत्ता बनवण्याचे त्याचे उद्दिष्ट आहे.”
21 वे शतक युवा भारताचे असल्याने पुढील 20-30 वर्षांत युवा भारताची उर्जा आणि प्रतिभा जगाच्या प्रगतीसाठी वापरली जाईल, असेही त्यांनी सांगितले. केवळ कमी किंमतीमुळे नव्हे तर देशाने पुरवलेल्या समृद्ध आणि बुद्धिमान मानवी भांडवलामुळे भारत जगाची अनुसंधान व विकास राजधानी होण्यास सज्ज आहे.
फिक्की उच्च शिक्षण परिषदेचे कौतुक करताना पोखरियाल म्हणाले की, गेल्या काही वर्षांत, ही शिखर परिषद एक वैचारिक नेतृत्व मंच म्हणून विकसित झाली आहे आणि ती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा आणि ज्ञानाचे आदानप्रदान व्हावे यासाठी धोरण निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, उद्योग आणि विद्यार्थ्यांसह मुख्य हितधारकांना एकत्र आणते.
* * *
S.Thakur/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1700825)
अभ्यागत कक्ष : 187