रेल्वे मंत्रालय

भारतीय रेल्वेचा अनारक्षित रेल्वे सेवा पुन्हा सुरू केल्या आहेत अशा परिमंडळ क्षेत्रांमध्ये यूटीएस ऑन मोबाईल अॅपची सुविधा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय


तिकीट खिडकीवरील गर्दी टाळण्यासाठी आणि सुरक्षित अंतर नियम सुनिश्चित करण्यासाठी, यूटीएस ऑन मोबाईल अ‍ॅप सुविधा सुरू

रेल्वे परिमंडळाला सूचना देण्यात आल्या आहेत की जेंव्हा जेंव्हा कोणत्याही रेल्वे परिमंडळात अनारक्षित रेल्वे सेवा सुरू केल्या जातील तेव्हा संबंधित रेल्वे परिमंडळ त्या अनुषंगाने अनारक्षित तिकिट देण्यासाठी यूटीएस ऑन मोबाइल अॅप सक्षम करू शकेल

प्रविष्टि तिथि: 25 FEB 2021 5:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 फेब्रुवारी 2021
 

तिकीट खिडकीवरील गर्दी टाळण्यासाठी आणि सुरक्षित अंतर नियम सुनिश्चित करण्यासाठी, यूटीएस ऑन मोबाईल अॅपद्वारे अनारक्षित तिकिट नोंदणी करण्याची सुविधा भारतीय रेल्वेने पुन्हा सक्रिय केली आहे.

भारतीय रेल्वेवर टप्प्याटप्प्याने अनारक्षित रेल्वे सेवा सुरू केल्या जात आहेत. प्रवाशांना अनारक्षित तिकिट नोंदणी करण्यात अडचण येऊ नये आणि तिकिट खरेदी करताना तिकीट खिडकीवर सुरक्षित अंतर नियम सुनिश्चित करण्यासाठी असा निर्णय घेण्यात आला आहे की उपनगरी विभागांमध्ये उपलब्ध यूटीएस ऑन मोबाईल अॅप सुविधा आता रेल्वे परिमंडळाच्या विना उपनगरी भागात देखील पुन्हा सुरू करण्यात यावी. रेल्वे परिमंडळाला सूचना देण्यात आल्या आहेत की जेव्हा जेव्हा कोणत्याही रेल्वे परिमंडळात अनारक्षित रेल्वे सेवा सुरू केल्या जातील तेव्हा संबंधित रेल्वे परिमंडळ त्या अनुषंगाने अनारक्षित तिकिट देण्यासाठी यूटीएस ऑन मोबाइल अॅप सक्षम करू शकेल.


* * *

S.Thakur/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1700814) आगंतुक पटल : 202
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Punjabi , Tamil