अर्थ मंत्रालय
प्राप्तिकर विभागाची पुण्यात विविध ठिकाणी शोध मोहीम
Posted On:
22 FEB 2021 4:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 फेब्रुवारी 2021
प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी 17 फेब्रुवारी 2021 रोजी संगमनेर आणि पुण्यातील एका कंपनीच्या, महाराष्ट्रातील 34 ठिकाणच्या विविध कार्यालयांवर शोध मोहीम आणि जप्तीची कारवाई केली. या कंपन्या, तंबाखू आणि त्याच्याशी संबधित उत्पादनांची निर्मिती, पॅकेजिंग आणि विक्री तसेच ऊर्जावितरण, एफएमसीजी आणि बांधकाम व्यवसायांशी संबधित आहेत.
या शोध मोहिमेत, हस्तलिखित आणि कॉम्युटर वरील एक्सेल शीट्स मध्ये असलेल्या हिशेबांमध्ये 243 कोटी रुपयांची बेहिशेबी रोख तंबाखू विक्री केल्याची माहिती आढळली. त्याशिवाय, काही तंबाखू उत्पादनांशी संबधित व्यवहारांची चौकशी करतांना, आणखी सुमारे 40 कोटी उत्पादनांची बेहिशेबी विक्री केल्याचेही आढळले.
हे व्यावसायिक, बांधकाम व्यवसायाशी संबंधित व्यवहारांमध्ये नोंदणीकृत किमतीपेक्षा अधिक रोख रक्कम स्वीकारत आणि देत असल्याचेही लक्षात आले आहे. यासंदर्भात 18 कोटी रुपयांचे रोखीचे व्यवहार झाल्याचे पुरावे आढळले आहेत. प्राप्तिकर कायदा 1961 च्या कलम 50C चे उल्लंघन केल्याप्रकरणी, 23 कोटी रुपयेही आढळले आहेत.
या शोध मोहिमेदरम्यान बांधकाम खरेदी विक्रीच्या बेहिशेबी व्यवहारांमध्ये 9 कोटी रुपयांचा नफा झाल्याचे या व्यावसायिकाने (करदात्याने) मान्य केले. एक कोटी रुपये इतकी बेहिशेबी रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे. आतापर्यंत या मोहिमेअंतर्गत, 335 कोटी रुपयांचे बेहिशेबी उत्पन्न आढळले आहे. याप्रकरणी पुढचा तपास सुरु आहे.
* * *
S.Tupe/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1699955)