रेल्वे मंत्रालय
पश्चिम बंगालमधील विविध प्रकल्पांचे पीयूष गोयल यांच्या हस्ते राष्ट्रार्पण
Posted On:
21 FEB 2021 6:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 फेब्रुवारी 2021
केंद्रीय रेल्वेमंत्री, वाणिज्य आणि व्यापार, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण व्यवस्था मंत्री पीयूष गोयल यांनी विविध पायाभूत विकास प्रकल्प तसेच उत्तर बंगाल विभागातील प्रवासी सुविधांसाठीची कामे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आज राष्ट्रार्पण केली. या कार्यक्रमाला महिला आणि बालकल्याण राज्यमंत्री देबश्री चौधरी व इतर मान्यवर उपस्थित होते.
“रेल्वे असामान्य पद्धतीने राष्ट्र सेवा करते. सोनार बांगला या मोहिमेसाठी रेल्वेने मेहनत घेत जबाबदारी निभावली”, असे यावेळी पीयूष गोयल यांनी सांगितले. पश्चिम बंगालमध्ये तीन वर्षांत रेल्वेचे संपूर्ण विद्युतीकरण होईल; तसेच आत्ता सुरू असलेले सर्व प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण केले जातील असे त्यांनी सांगितले. पश्चिम बंगालचा भाग नैसर्गिकरीत्याच सौंदर्यपूर्ण असल्याचे सांगत या भागाचा विकास जास्तीत जास्त पर्यटकांना येथे घेऊन येईल असे त्यांनी नमूद केले. या प्रदेशाच्या समग्र विकासाला रेल्वे कटिबद्ध असल्याची हमी त्यांनी यावेळी दिली
M.Chopade/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1699798)
Visitor Counter : 191