राष्ट्रपती कार्यालय

श्री. गुरु रविदास यांच्या सारख्या प्रभूती संपूर्ण मानवजातीच्या आहेत : राष्ट्रपती कोविंद


राष्ट्रपतींनी ‘श्री . गुरु रविदास विश्व महापीठाच्या राष्ट्रीय अधिवेशन -2021’ चे भूषविले अध्यक्षस्थान

Posted On: 21 FEB 2021 4:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 फेब्रुवारी 2021

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले की, संत रविदासजींसारख्या प्रभूती संपूर्ण मानवजातीच्या आहेत.ते श्री. गुरु रविदास विश्व महापीठाच्या राष्ट्रीय अधिवेशनाला नवी दिल्ली येथे संबोधित करत होते.(दिनांक फेब्रुवारी 21,2021) राष्ट्रपती म्हणाले, की रविदासांचा जन्म एखाद्या विशिष्ट समुदाय, पंथ किंवा धर्मात झाला असेल पण त्यांच्या सारखे संत सर्व सीमा ओलांडून त्या पार जातात ,संत कोणत्याही जाती,पंथ अथवा प्रांताचे नसतात.ते संपूर्ण मानवजातीच्या हितासाठी पावले उचलतात.संतांचे आचरण असे सर्व प्रकारच्या भेदभाव आणि संकुचित पणाच्या मर्यादांच्या पुढे जाते.

संत रविदासांची सामाजिक न्याय समता आणि बंधुभाव ही तत्वे आणि  मूल्ये आपल्या घटनेने अंगिकारली आहेत त्याबद्दल राष्ट्रपतींनी संतोष व्यक्त केला. 

आपल्या घटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या तत्वांत  गुरु रविदास यांनी व्यक्त केलेल्या मूल्यांना अंगिकारले आहे असे राष्ट्रपती म्हणाले.

राष्ट्रपती म्हणाले की, संत रविदास यांनी समाजातील कोणत्याही व्यक्तीला अथवा समाजाच्या थराला आपल्या प्रेम आणि करुणा यांच्या परीघाबाहेर काढले नाही.संतांनी जर आपल्याला एखाद्याच समुदायाशी जोडून घेतले, तर तसे पहाता ते संत रविदास यांनीच उपदेश केलेल्या सर्वसमावेशक तत्वाच्या विरोधात होईल. म्हणून लोकांनी त्यांचा विचार आणि दृष्टीकोन बदलायला हवा.अशा समारंभात समाजातील सर्व विभागांचा सहभाग  सुनिश्चित  करण्याचे प्रयत्न करायला हवेत.ते म्हणाले की अशा प्रयत्नांमुळे देशात सामाजिक समता आणि सुसंवाद वाढण्यास मदत होईल.

राष्ट्रपती म्हणाले की, गुरु रविदासजी यांनी समतेवर आणि भेदभावापासून मुक्त समाजाची कल्पना केली होती त्याला त्यांनी बे-गमपुरा असे नाव दिले होते,म्हणजे असे शहर जिथे कोणतेही दु:ख अथवा भीती यांना थारा नाही.असे आदर्श शहर जेथे भय,असुरक्षितता आणि टंचाई नसेल.सर्वांना समानता  आणि सर्वांची  समृध्दि अशा  सुयोग्य मार्गांचा वापर करून  त्यावर आधारीत कायद्याचे राज्य असे त्या शासनाचे तत्व असेल.अशा शहराच्या दृष्टीकोनाचे जे समर्थन करतील त्यांनाच संत रविदास आपले खरे सहकारी मानत असत.

राष्ट्रपती म्हणाले की, संत रविदास अशा बे-गमपुरा शहराच्या भारताचे स्वप्न पहाण्याची इच्छा व्यक्त करत होते. ते आपल्या समकालीन समाजाला समता आणि न्याय यावर आधारीत देश घडविण्याची प्रेरणा देत होते. आज आपण सर्व नागरीकांचे कर्तव्य आहे की त्यांनी असा देश आणि समाज निर्माण करण्यासाठी एकत्र येऊन कार्य करायला हवे आहे आणि संत रविदासांचे सच्चे अनुयायी म्हणून घेण्याची पात्रता बाळगायला हवी आहे.

राष्ट्रपतींचे भाषण पहाण्यासाठी येथे क्लिक करा.

 

Jaydevi PS/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1699767) Visitor Counter : 280