अर्थ मंत्रालय

जीएसटी महसूलाची तूट भरून काढण्यासाठी राज्यांना वितरित केलेली रक्कम रुपये 1 लाख कोटीपर्यंत


राज्यांना शुक्रवारी, 19 फेब्रुवारी 2021 रोजी 5,000 कोटी रुपयांचा 17 वा हफ्ता जारी

Posted On: 20 FEB 2021 1:48PM by PIB Mumbai

 

जीएसटी महसूलाची तूट भरून काढण्यासाठी, केंद्रीय वित्त मंत्रालयाने 5,000 कोटी रुपयांचा 17 वा साप्ताहिक हप्ता राज्यांना जारी केला आहे. यापैकी 4,730.41 कोटी रुपये रक्कम 23 राज्यांना तर 269.59 कोटी रुपये दिल्ली, जम्मू आणि काश्मिर तसेच पुद्दुचेरी या विधानसभा असलेल्या तीन केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आले आहेत, जे जीएसटी परिषदेचे सदस्य आहेत. अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मिझोरम, नागालँड आणि सिक्कीम या उर्वरित पाच राज्यात महसूल तूट नाही.

आतापर्यंत, जीएसटी भरपाईच्या एकूण अंदाजित रकमेपैकी 91 टक्के हिस्सा विधानसभा असलेली राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना जारी करण्यात आला आहे. या रकमेपैकी 91,460.34 कोटी रुपये राज्यांना जारी करण्यात आली आहे आणि 8,539.66 कोटी रुपये रक्कम विधानसभा असलेल्या 3 केंद्रशासित प्रदेशांना जारी करण्यात आली आहे.

जीएसटी अंमलबजावणीमुळे महसुलातील 1.10 लाख कोटी रुपयांची अंदाजित तूट भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने ऑक्टोबर 2020 मध्ये, विशेष कर्ज खिडकी योजना सुरू केली. या खिडकीमार्फत काज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या वतीने केंद्राकडून कर्ज काढण्यात येत आहे. 23 ऑक्टोबर 2020 पासून ही जारी करण्यास प्रारंभ झाला आहे.

आज जारी करण्यात आलेली रक्कम हा 17 वा हप्ता आहे. या आठवड्यात घेतलेले कर्ज 5.5924 टक्के व्याजदराने घेण्यात आले आहे. या विशेष कर्ज खिडकी अंतर्गत, आतापर्यंत केंद्र सरकारकडून सरासरी 4.8307 टक्के व्याज दराने 1,00,000 कोटी रुपये कर्ज म्हणून घेण्यात आले आहेत.

28 राज्यांना अतिरिक्त कर्ज काढण्यासाठी परवानगी देण्यात आलेली रक्कम आणि विशेष कर्ज खिडकीद्वारे उभारण्यात आलेली आणि राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांना जारी करण्यात आलेली रक्कम याप्रमाणे आहे.

 

S. No.

Name of State / UT

Additional borrowing of 0.50 percent allowed to States

Amount of fund raised through special window passed on to the States/ UTs

1

Andhra Pradesh

5051

2222.71

2

Arunachal Pradesh*

143

0.00

3

Assam

1869

956.04

4

Bihar

3231

3755.77

5

Chhattisgarh

1792

2143.75

6

Goa

446

807.89

7

Gujarat 

8704

8869.60

8

Haryana

4293

4185.66

9

Himachal Pradesh 

877

1651.39

10

Jharkhand

1765

1164.60

11

Karnataka

9018

11932.82

12

Kerala

4,522

4304.12

13

Madhya Pradesh

4746

4368.43

14

Maharashtra

15394

11519.31

15

Manipur*

151

0.00

16

Meghalaya

194

107.73

17

Mizoram*

132

0.00

18

Nagaland*

157

0.00

19

Odisha

2858

3675.95

20

Punjab

3033

6239.58

21

Rajasthan

5462

4081.71

22

Sikkim*

156

0.00

23

Tamil Nadu

9627

6002.53

24

Telangana

5017

1940.95

25

Tripura

297

217.34

26

Uttar Pradesh

9703

5777.46

27

Uttarakhand

1405

2227.49

28

West Bengal

6787

3307.51

 

Total (A):

106830

91460.34

1

Delhi

Not applicable

5640.89

2

Jammu & Kashmir

Not applicable

2185.16

3

Puducherry

Not applicable

713.61

 

Total (B):

Not applicable

8539.66

 

Grand Total (A+B)

106830

100000.00

* These States have ‘NIL’ GST compensation gap

***

S.Tupe/S.Shaikh/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1699611) Visitor Counter : 178