रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

पंतप्रधानांच्या हस्ते आसाममध्ये दोन पुलांची पायाभरणी

प्रकल्प स्थानिक नागरिकांची 10 वर्षांपासूनची मागणी पूर्ण करणार- गडकरी

Posted On: 18 FEB 2021 5:06PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ब्रह्मपुत्र नदीवरील दोन महत्वपूर्ण पूल प्रकल्पांची पायाभरणी केली. यामुळे आसाम आणि मेघालयातील लोकांची प्रलंबित मागणी पूर्ण झाली.

आसाममध्ये एक लाख कोटी रुपयांच्या रस्ते आणि पायाभूत सुविधांची कामे हाती घेण्यात येत आहेत असे केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले.

मागील सहा वर्षात राज्यात 8,000 कोटी रुपये खरच करून 1,300 किलोमीटर लांबीच्या 91 रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून वर्ष 2022 पर्यंत 20,000 कोटी रुपयांची कामे पूर्ण केली जातील.

या वर्षामध्ये 30,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांसाठी डीपीआर तयार होईल असेही ते पुढे म्हणाले.

केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी 18 फेब्रुवारी 2021 रोजी आसाममध्ये पुलाच्या पायाभरणी कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना आसाममधील धुबरी आणि मेघालयातील फुलबारी दरम्यान ब्रह्मपुत्र नदीवरील पुलाची मागणी ही दहा वर्ष जुनी आहे असे गडकरी म्हणाले. हा पूल तयार झाल्यानंतर दोन्ही ठिकाणांमधील अंतर 203 किलोमीटर ने कमी होईल. पुलामुळे आसाम आणि मेघालय पश्चिम बंगालशी थेट जोडले जातील. पश्चिम बंगालमधील से्रामपूर ते आसामच्या धुबरीपर्यंतचा 55 किमी लांबीचा रस्ता या ऑक्टोबरमध्ये वाहतुकीसाठी सुरू होईल. यामुळे भूतान आणि बांगलादेश प्रवासातील अंतर कमी होऊन वेळ वाचेल.

ब्रह्मपुत्र नदीच्या दक्षिण किनाऱ्यावरील मेघालय (फुलबारी) आणि ब्रह्मपुत्र नदीच्या उत्तर किनाऱ्यावरील आसामच्या (धुबरी जवळ) लोकांना मेघालय आणि आसाममधील शहरांमध्ये आपल्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांसाठी लांब पल्ल्याचा प्रवास करावा लागतो. 497 कोटी रुपये खर्च करून राष्ट्रीय महामार्ग-127ब वर आसाम आणि मेघालय राज्यातून जाणाऱ्या ब्रह्मपुत्र नदीवर बांधण्यात येणाऱ्या या चौपदरी धुबरी - फुलबारी पुलामुळे 205 किलोमीटर लांबीचा प्रवास केवळ 19 किलोमीटरवर येईल आणि आता या प्रवासासाठी लागत असणारा 6 तासांचा कालावधी कमी होऊन या प्रवासासाठी भविष्यात केवळ 20 मिनिटे लागतील.

अधिक माहितीसाठी कृपया येथे क्लिक करा.

 

 M.Chopade/S.Mhatre/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1699080) Visitor Counter : 7