गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय

‘कोहोर्ट’ अर्थात नर्चरिंग नेबरहुड्स चॅलेंज जाहीर


25 कोहोर्ट शहरांची अंतिम यादी जाहीर

Posted On: 18 FEB 2021 4:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी 2021

केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या स्मार्ट सिटीज अभियानाने बर्नार्ड व्हॅन लीअर फाऊंडेशन (बीव्हीएलएफ) आणि तांत्रिक भागीदार डब्ल्यूआरआय इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नर्चरिंग नेबरहुड्स चॅलेंज’ कोहोर्टसाठी (आपल्या आजूबाजूचा परिसर विकास आव्हान)  अंतर्गत पंचवीस (25) शहरांची अंतिम यादी जाहीर केली आहे. हा 3-वर्षाचा उपक्रम आहे, सरकारच्या स्मार्ट सिटीज मिशन अंतर्गत मुलांचे बालपण केंद्रस्थानी ठेवून शेजारील परिसराचा विकास करण्यास मदत करणे हे याचे उद्दिष्ट आहे.

‘नर्चरिंग नेबरहुड्स चॅलेंज’ अर्थात कोहोर्टसाठी खालील शहरे निवडली आहेत: आगरतळा, बंगळूरू, कोइंबतूर, धर्मशाला, इरोडे, हुबळी-धारवाड, हैदराबाद, इंदूर, जबलपूर, काकीनाडा, कोची, कोहिमा, कोटा, नागपूर, राजकोट, रांची, रोहतक, राउरकेला, सालेम, सूरत, तिरुवनंतपुरम, तिरुपुर, उज्जैन, वडोदरा आणि वारंगल.

आव्हानाच्या पहिल्या टप्प्यात शहर आस्थापनाकडून 7 फेब्रुवारी 2021 पर्यंत खुल्या पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. संपूर्ण देशातील 63 शहरांनी लहान मुले आणि त्यांच्या पालकांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य वाढविण्यासाठी त्यांना सहजरीत्या सार्वजनिक जागा, गतिशीलता आणि सेवा प्राप्त व्हाव्यात यासाठी स्थानिक पातळीवर पायलट प्रकल्पांचे प्रस्ताव असलेले अर्ज सादर केले. अर्जदार शहरांच्या यादीतून, मूल्यांकन समितीने त्यांच्या अर्जांच्या गुणवत्तेच्या  आधारे 25 शहरांची अंतिम निवड केली. शहरांनीआपले अर्ज सादर करताना  वैविध्यपूर्ण प्रकल्पांचा विविध प्रकार प्रस्तावित केले.

स्मार्ट सिटीज अभियानाचे संयुक्त सचिव आणि अभियान संचालक, कुणाल कुमार म्हणाले, लहान मुलांच्या समृद्ध बालपणासाठी आरोग्यदायी शहरी वातावरण निर्माण करण्यासाठी शहरांना सहभागी करून या आव्हानाने स्थानिक पातळीवरील शेजारील परिसर विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. आमच्या नागरिकांची गुणवत्ता वाढविणार्‍या स्थानिक क्षेत्रात सुटसुटीत, सर्वसमावेशक, लोकाभिमुख विकासासाठी शहर-व्यापी उपाययोजना वाढविण्यासाठी स्मार्ट सिटी मिशनच्या धोरणाशी हा दृष्टिकोन सुसंगत आहे.

शहरांचा सहभाग

तीन महिन्यांच्या अर्जाच्या कालावधीत, नर्चरिंग नेबरहुड्स चॅलेंजअंतर्गत 100 पेक्षा जास्त शहरे दूरस्थ किंवा वैयक्तिक चर्चा आणि ऑनलाइन क्षमता-निर्माण कार्यशाळांमध्ये सहभागी झाली.

एकत्रितपणे, संपूर्ण देशभरात 300 पेक्षा जास्त पायलट प्रकल्प प्रस्तावित आहेत जे 0-5 वर्षे वयोगटातील 12 लाख मुलांचे जीवनमान सुधारतील.

आव्हानाविषयी

सर्वसमावेशक विकासाच्या मुख्य उद्देशांतर्गत, केंद्र सरकार सर्व असुरक्षित नागरिकांसाठी, विशेषत: लहान मुलांसाठी शहरी भागात संधी वाढविण्यासाठी वचनबद्ध आहे.  4 नोव्हेंबर, 2020 रोजी सुरू करण्यात आलेल्या नर्चरिंग नेबरहुड्स चॅलेंजने सर्व स्मार्ट शहरे, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची राजधानी आणि 5 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांना यात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले. 3 वर्ष कालावधीच्या या उपक्रमात, निवडलेल्या शहरांना त्यांचा प्रस्ताव, सज्जता आणि वचनबद्धतेच्या आधारे-लहान मुलांचे जीवनमान सुधारणारे प्रायोगिक प्रकल्प आणि स्थानिक समाधान विकसित करण्यासाठी आवश्यक ती  तांत्रिक मदत आणि क्षमता-निर्मिती उपलब्ध करून दिली जाईल.

  • नर्चरिंग नेबरहुड्स चॅलेंज विषयी अधिक माहितीसाठी कृपया येथे भेट द्या-

 https://smartnet.niua.org/nurturing-neighbourhoods-challenge/web/

 

  • चॅलेंजच्या नियमित माहितीसाठी, ट्विटरवर @WRICitiesIndia ला फॉलो करा

 

Jaydevi PS/S.Mhatre/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1699068) Visitor Counter : 299