सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
थावरचंद गेहलोत यांनी आभासी माध्यमातून 10,000 शब्दावलीच्या भारतीय सांकेतिक भाषा शब्दकोषाची 3 री आवृत्ती प्रकाशित केली
Posted On:
17 FEB 2021 6:45PM by PIB Mumbai
केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्री थावरचंद गहलोत यांनी आज एका आभासी कार्यक्रमात 10,000 शब्दावलीच्या (आधीच्या 6000 शब्दावलीसह) भारतीय सांकेतिक भाषा शब्दकोषाची 3 री आवृत्ती आज प्रकाशित केली. सामाजिक न्याय व सबलीकरण राज्यमंत्री कृष्ण पाल गुर्जर हे या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाच्या, दिव्यांग व्यक्ती सबलीकरण विभागांतर्गत कार्यरत भारतीय सांकेतिक भाषा संशोधन व प्रशिक्षण केंद्र (आयएसएलआरटीसी) या स्वायत्त संस्थेने हा शब्दकोश तयार केला आहे.
आता आयएसएल शब्दकोषाच्या तिसर्या आवृत्तीत दैनंदिन वापरातील शैक्षणिक, कायदेशीर ,प्रशासकीय, वैद्यकीय, तांत्रिक आणि कृषी संबंधित एकूण 10,000 शब्द आहेत. व्हिडिओंमध्ये चिन्ह, चिन्हासाठी इंग्रजी संज्ञा आणि जिथे आवश्यक आहे तिथे चित्रे आहेत. शब्दकोशात देशाच्या विविध भागांमध्ये वापरली जाणारी प्रादेशिक चिन्हे देखील आहेत.
केंद्र सरकार आपल्या देशातील दिव्यांगजनांच्या सर्वांगीण कल्याणासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे तसेच गेल्या सात वर्षांत दिव्यांगाजनांसाठी शैक्षणिक संस्थांमध्ये आणि नोकरीत राखीव जागा ठेवणे यासह अनेक नवीन योजना सुरू केल्या आहेत.
***
M.Chopade/S.Mhatre/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1698795)
Visitor Counter : 197