संरक्षण मंत्रालय

बॉईज स्पोर्ट कंपनी- बॉम्बे इंजिनियर ग्रुप खडकी, पुणेमध्ये रोईंग, जिम्नॅस्टिक आणि बास्केटबॉल खेळासाठी निवड प्रक्रिया

Posted On: 17 FEB 2021 5:01PM by PIB Mumbai

           

            बॉम्बे इंजिनियर ग्रुप आणि केंद्र,   खडकी,  पुणे येथील बॉईज स्पोर्ट्स कंपनीमध्ये 25 मार्च ते 31 मार्च 2021 या कालावधीत भरती होणार आहे. राज्य/राष्ट्रीय/  आंतरराष्ट्रीय स्तरावरील पदक विजेत्यांना या भरती प्रक्रियेत प्राधान्य दिले जाईल. यासाठी सकाळी 07  ते 10 या वेळेत प्रवेश दिला जाईल.         

 पात्रता निकष

Ser No

Discipline

Age

Education Qualification

(a)

Rowing, Gymnastics & Basketball

Age group of 08 – 14 years (born between 25 March 2007 and 25 March 2013 inclusive of both dates)

Minimum 4th standard pass

3. उमेदवाराला त्याच्या पालकासह खालील प्रमाणपत्रे (मूळ) घेऊन भरती प्रक्रियेसाठी बॉईज स्पोर्ट कंपनी, बॉम्बे इंजिनियर ग्रुप आणि केंद्र, खडकी, पुणे येथे यावे हजर राहावे लागेल: -

(a) जन्म प्रमाणपत्र (जन्म व मृत्यू निबंधकाद्वारे जारी केलेले प्रमाणपत्र)

(b) शाळेचे मुख्याध्यापक यांनी जारी केलेले शैक्षणिक प्रमाणपत्र / गुण पत्रिका.

(c) संबंधित खेळातील कामगिरीचे प्रमाणपत्र.

(d) जातीचे प्रमाणपत्र

(e) तहसीलदार / एसडीओ / एसडीएम यांनी दिलेले निवासी / अधिवास प्रमाणपत्र

(f)  पासपोर्ट आकाराचे 10 फोटो

(g) आधारकार्ड

(h) चरित्र/वर्तणूक प्रमाणपत्र

(j) संबंधित खेळांमध्ये भाग घेण्यासाठी आवश्यक असणारे साहित्य.

4. उमेदवाराला स्वत: च्या खर्चाने भरती प्रक्रियेसाठी यावे लागेल. निवड प्रक्रियेवेळी उमेदवार आणि त्याच्या सोबतच्या व्यक्तीने त्यांच्या निवास आणि प्रवासाची व्यवस्था स्वतः करावी.

5. निवड झालेल्या उमेदवाराला मोफत भोजन, राहण्याची सोय, इयत्ता 10वी पर्यंत शिक्षण, खेळाचे साहित्य, वैद्यकीय सुविधा व कुशल परीक्षक इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. त्यानंतर , भरती नियमांच्या तरतुदीनुसार पात्र क्रीडा उमेदवाराची भारतीय सैन्यात भरती होईल.

6. कोविड -19 सावधगिरीचे उपाय. सर्व उमेदवारांनी भरती प्रक्रियेसाठी येताना मास्क, हातमोजे घालून यावे तसेच आरटी-पीसीआर / रॅपिड एन्टीजेन चाचणी करून त्याचे प्रमाणपत्र सादर करावे.

7. अधिक तपशीलासाठी संपर्क क्रमांक - 9322581748/7992200216/8764063579/7030458444

 

M.Chopade/S.Mhatre/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1698717) Visitor Counter : 274