पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान 17 फेब्रुवारीला तामिळनाडूतील इंधन व वायू क्षेत्रातील महत्वाच्या प्रकल्पांची पायाभरणी व राष्ट्रार्पण करणार

Posted On: 15 FEB 2021 10:21PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी 2021

पंतप्रधान तामिळनाडूतील इंधन व वायू क्षेत्रातील महत्वाच्या प्रकल्पाची पायाभरणी व राष्ट्रार्पण 17 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 4.30 वाजता दूरस्थ पद्धतीने करणार आहेत. पंतप्रधान यावेळी रामनाथपुरम-थुथूकुडी चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचा नैसर्गीक वायू पाईपलाईन व गॅसोलाईन डिसल्फरायझेशन युनिट, मनाली हे राष्ट्राला अर्पण करतील. तसेच नागपट्टीनम कावेरी बेसिन रिफायनरी प्रकल्पाची पायाभरणी देखील करतील.  

या प्रकल्पांमुळे लक्षणीय सामाजिक आर्थिक लाभ होतील व देशाची उर्जा आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुकर होईल. तामिळनाडूचे राज्यपाल व मुख्यमंत्री व केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गीक वायू  मंत्रीही या समारंभाला उपस्थित असतील.

प्रकल्पाची माहिती

एन्नोर-थिरुवल्लूर-बंगळुरू-पुद्दुचेरी- नागापट्टनम- मदुराई-तुतीकोरीन यामधील रामनाथपुरम-थूथुकुडी विभागात (143 किमी) 700 कोटी रुपये खर्चून गॅस पाईपलाईन टाकली जाणार आहे. यामुळे ONGC वायू क्षेत्रातून नैसर्गीक वायू घेणे व उद्योग तसेच व्यावसायिक ग्राहकांना कच्चा माल म्हणून पुरवणे शक्य होईल.

चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे गॅसोलीन डीसल्फरायझेशन युनिट (CPCL), मनाली 500 कोटी रुपये खर्चून उभारले आहे. त्यातून लो सल्फर ( 8 ppm पेक्षा कमी), पर्यावरणस्नेही गॅसोलिन यांचे उत्पादन होईल.

नागापट्टणम येथील कावेरी खोरे तेलशुद्धीकरण कारखाना हा वार्षिक 9 दशलक्ष मेट्रिक टनाची क्षमता असलेला कारखाना आहे. IOCl CPCL च्या संयुक्त भागीदारीत उभारलेल्या या प्रकल्पाची अंदाजित किंमत 31,500 कोटी रुपये आहे. BS-VI नियमांनुकुल स्पिरिट व डिझेलचे उत्पादन येथे होईल व त्याशिवाय पॉलिप्रोपीलीनचेही उत्पादन घेता येईल.

 

M.Chopade/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1698282) Visitor Counter : 223