संरक्षण मंत्रालय

प्रजासत्ताक दिन संचलन हे देशाच्या विविधतेतील एकतेचे प्रतीक असून लष्कराची सामर्थ्यातील प्रगती दर्शविते - केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह

Posted On: 15 FEB 2021 5:01PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी 2021

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 15 फेब्रुवारी, 2021 रोजी नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिन संचलन 2021 च्या सर्वोत्तम संचलन करणाऱ्या पथकाला चषक प्रदान केला. तिन्ही सैन्यदलांमधील जाट रेजिमेंटल सेंटरने उत्कृष्ट संचलन पथकाचा करंडक जिंकला, तर केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (सीएपीएफ) आणि इतर सहाय्यक सेवांमध्ये सर्वोत्तम संचलन पथकाचा किताब दिल्ली पोलिसांना मिळाला. जाट रेजिमेंटल सेंटर च्या वतीने ब्रिगेडियर आदर्श के बुटेल व सुभेदार मेजर (मानद कॅप्टन) वीरेंद्र यांनी चषक स्वीकारला तर दिल्ली पोलिसांच्या वतीने विशेष पोलिस आयुक्त रॉबिन हिबू आणि सहायक पोलिस आयुक्त विवेक भगत यांनी या चषकाचा स्वीकार केला. दोन न्यायाधीशांच्या पॅनेलने केलेल्या मुल्यांकनांच्या आधारे या दोन्ही पथकांची निवड करण्यात आली.

जाट रेजिमेंटल सेंटर आणि दिल्ली पोलिसांच्या मेहनत आणि समर्पणाचे प्रतीक म्हणून हा सन्मान असल्याचे सांगत संरक्षणमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

सर्वात प्राचीन आणि सर्वात मोठी लोकशाही असलेला भारत म्हणजे विविध संस्कृती आणि धर्मांची भूमी असल्याचे वर्णन करताना संरक्षणमंत्री म्हणाले की प्रजासत्ताक दिनाच्या संचालनादरम्यान वेगवेगळ्या पथकांचे संचलन हे देशाच्या विविधतेतील एकतेचे प्रतीक असून यातून राष्ट्रीय अभिमान आणि सुरक्षा दलाच्या तत्परतेची भावना प्रतिबिंबित होते.

संरक्षण दलप्रमुख जनरल बिपिन रावत, नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल करमबीर सिंह, हवाईदलप्रमुख एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया, लष्करप्रमुख जनरल एम.एम. नरवणे, संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार, संरक्षण च्या संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि संरक्षण, संशोधन आणि विकास संस्थेचे अध्यक्ष (डीआरडीओ) डॉ. जी. सतीश रेड्डी आणि संरक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ नागरी व सैन्य अधिकारी आणि गृह मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

 

 

S.Tupe/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1698155) Visitor Counter : 157