रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

उद्या मध्यरात्रीपासून FASTag अनिवार्य घोषित

Posted On: 14 FEB 2021 7:47PM by PIB Mumbai

 

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने निर्णय घेतला आहे की राष्ट्रीय महामार्गांवरील फी प्लाझामधील सर्व लेन 15/16 फेब्रुवारी 2021 च्या मध्यरात्रीपासून फी प्लाझाची फास्टॅग लेन म्हणून घोषित करण्यात येतील. त्यामुळे  एनएच शुल्क अधिनियम 2008 नुसार FASTag लेनमध्ये प्रवेश करणारे FASTag न बसवलेले  कोणतेही वाहन किंवा वैध, कार्यरत  FASTag शिवाय प्रवेश करणाऱ्या वाहनांना त्या श्रेणीस लागू असलेल्या शुल्काच्या दुप्पट शुल्क भरावे लागेल.

आज जारी केलेल्या निवेदनात मंत्रालयाने स्पष्ट  केले आहे की डिजिटल पद्धतीने फी भरायला चालना देण्यासाठी, प्रतीक्षा वेळ आणि इंधनाचा वापर कमी करण्यासाठी आणि फी प्लाझामधून विनाव्यत्यय प्रवास करता यावा यासाठी हे केले गेले आहे. मंत्रालयाने 1 जानेवारी 2021 पासून मोटार वाहनांच्या एम अँड एन प्रवर्गात FASTag बसवणे अनिवार्य केले होते.

प्रवर्ग एमम्हणजे  प्रवासी वाहतूक करणारे कमीतकमी चार चाकी मोटर वाहन  आणि एनमालवाहतूक करणारे किमान चारचाकी वाहन जे सामानाबरोबरच माणसांनाही घेऊन जाऊ शकतात.

***

M.Chopade/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1697978) Visitor Counter : 586