पर्यटन मंत्रालय
पर्यटन मंत्रालयाच्या देखो अपना देश या वेबिनार अंतर्गत व्होकल फॉर ग्लोबल याविषयी चर्चा
: स्थानिक समुदायांचे सबलीकरण : गुजरात अनुभव
Posted On:
14 FEB 2021 5:43PM by PIB Mumbai
पर्यटन मंत्रालयाने देखो अपना देश या वेबिनार मालिकेअंतर्गत 76 भागत व्होकल फॉर ग्लोबल: स्थानिक समुदायांचे सबलीकरण :गुजरात अनुभव या विषयी चर्चा दिनांक 13 फेब्रुवारी 2021 रोजी करण्यात आली.स्थानिक समुदायांना अपार आर्थिक संधी दिल्याने भारतातील पर्यटन क्षेत्रावर खुप चांगला परिणाम झाला आहे. रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे, उत्पन्न मिळविणे, राहणीमान वाढविणे आणि आणि साधारणपणे पर्यटनाने स्थानिक समाजाची उत्पन्नाची पातळी वाढविणे या साठी उद्योजकता हा आवश्यक घटक समजला जातो. वेबिनारमध्ये केवाडियाच्या आजूबाजूच्या भागातील स्थानिक समाजाच्या आणि गुजरातमधील विणकर जे स्वतः उत्पादन करतात त्यांच्या सबलीकरणाबाबत चर्चा करण्यात आली. तसेच राज्याच्या या हस्तकलेच्या वारशामुळे स्थानिकांना कसा रोजगार उपलब्ध झाला त्यावर चर्चा झाली. यामुळे स्थानिकांना केवळ रोजगाराच्या संधीच उपलब्ध झाल्या,एवढेच नव्हे तर अनेक शतकांचा कला आणि हस्तकलेचा वारसा जपण्यातही महत्त्वाची मदत झाली.
केवाडिया- हे गुजरातमधील वैशिष्ट्यपूर्ण आणि अत्यंत वेगाने विकसित होत असलेले पर्यटन स्थळ आहे.भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा
182 मीटर उंचीचा पुतळा इथे असून स्टँच्यू ऑफ लिबर्टी म्हणून ओळखले जाणारे नर्मदा जिल्ह्यातील केवाडिया हे सर्व वयोगटातील लोकांसाठी कौटुंबिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित झाले आहे.
देखो अपना देश ही वेबिनार मालिका माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या राष्ट्रीय ई-शासकीय विभागाच्या तांत्रिक सहाय्याने सादर केली जाते.या वेबिनारची सत्रे https://www.youtube.com/channel/UCbzIbBmMvtvH7d6Zo_ZEHDA/featured या संकेतस्थळावर तसेच भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या सामाजिक माध्यमांवर उपलब्ध आहेत.
यापुढील वेबिनार दिनांक 20फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 11वाजता साहसी पर्यटन या विषयावर आयोजित केली आहे.
***
Jaydevi PS/S.Patgoankar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1697941)
Visitor Counter : 181