रेल्वे मंत्रालय
सर्व प्रवासी रेल्वेगाड्या पुन्हा सुरू करण्याच्या वृत्तासंदर्भात स्पष्टीकरण
Posted On:
13 FEB 2021 4:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी 2021
एप्रिल महिन्यात एका विशिष्ट तारखेपासून सर्व प्रवासी रेल्वेगाड्यांच्या सेवा पुन्हा सुरू होण्यासंदर्भात प्रसारमाध्यमांमध्ये अनेक प्रकारच्या वृत्तांची मालिका सुरू आहे.
प्रसारमाध्यमांना त्याबाबत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने स्पष्टीकरण देण्यात आले आहे. सर्व प्रवासी रेल्वेगाड्या पुन्हा सुरू करण्यासाठी अशी कोणतीही तारीख निश्चित करण्यात आलेली नाही, असे त्यांना वारंवार सांगितले जात आहे.
रेल्वेती विविध रेल्वेगाड्यांच्या सेवा टप्प्याटप्प्याने सुरू करत आहे.
यापूर्वीच 65 टक्क्यांहून अधिक रेल्वेगाड्या धावत आहेत. एकट्या जानेवारी महिन्यात 250 पेक्षा जास्त गाड्यांची भर घालण्यात आली. त्यामध्ये कालांतराने आणखी वाढ होत जाईल.
या संदर्भात सर्व संबंधितांकडून मिळालेली माहिती विचारात घेण्याची आणि सर्व बाबींची काळजी घेण्याची गरज आहे.
याबाबत कोणत्याही प्रकारची भाकिते टाळण्याची सर्वांना विनंती करण्यात येत आहे. याबाबत काही निर्णय झाल्यास प्रसारमाध्यमे आणि जनतेला त्याची माहिती कळवण्यात येईल.
* * *
S.Patil/S.Shaikh/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1697747)
Visitor Counter : 241