संरक्षण मंत्रालय

प्रसिद्धी पत्रक

Posted On: 13 FEB 2021 3:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी 2021


भारत सरकारचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, कीर्ती चक्रप्राप्त अजित डोवाल यांनी 12 फेब्रुवारी 2021 रोजी रुड़की येथील बंगाल इंजिनिअर ग्रुप(बीईजी) अँड सेंटर, ला भेट दिली. बेंगाल सॅपर्समध्ये 36 वर्षांची प्रदीर्घ कारकीर्द आणि तरबेज हॉकी खेळाडू असलेले त्यांचे वडील मेजर गुणानंद डोवाल यांच्या स्मरणार्थ हॉकी विजेतेपद स्पर्धेचा फिरता चषक प्रदान करण्यासाठी या सेंटरमध्ये आयोजित समारंभात ते सहभागी झाले.या कार्यक्रमाच्या वेळी बीईजी अँड सेंटरचा संघ आणि बेंगॉल सॅपर्सच्या विविध रेजिमेंट्सचा संघ यांच्यात एक प्रदर्शनीय सामना खेळवण्यात आला. अजित डोवाल यांनी या सोहोळ्याला संबोधित केले.भारतीय लष्करातील सैनिक म्हणून अभिमान बाळगणाऱ्या आणि त्याचबरोबर एक सच्चा बेंगॉल सॅपर अशी ओळख सांगणाऱ्या आपल्या वडिलांच्या स्मृतींना अजित डोवाल यांनी उजाळा दिला. त्यांनी लेफ्टनंट जनरल हरपाल सिंग पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएसएम, ई-इन-सी आणि कर्नल कमांडंट, द कॉर्पस ऑफ इंजिनीअर्स यांच्या देश सेवेबद्दल प्रशंसा केली आणि बी.इ.जी. आणि सेंटर टीमला “डोवाल चषक” प्रदान करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.


* * *

S.Patil/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1697727) Visitor Counter : 145