आदिवासी विकास मंत्रालय

ई-गव्हर्नन्समधील उत्कृष्ट कार्यासाठी केंद्रीय आदिवासी कल्याण मंत्रालयाला 18वा सीएसआय एसआयजी ई- गव्हर्नन्स पुरस्कार 2020 मध्ये कृतज्ञता पुरस्कार प्राप्त

Posted On: 13 FEB 2021 3:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी 2021


केंद्रीय आदिवासी कल्याण मंत्रालयाला, माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञानाचा उपक्रम म्हणून सुरू केलेला 'आदिवासी सक्षमीकरण-बदलता भारत' या प्रात्यक्षिक डॅशबोर्डसाठी 18वा सीएसआय एसआयएन ई गवर्नन्स पुरस्कार 2020चा प्रशंसा पुरस्कार प्रदान करण्यात आला. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांच्या हस्ते आदिवासी कल्याण मंत्रालयाचे सहसचिव डॉ. नवलजीत कपूर यांनी लखनऊ येथे काल हा पुरस्कार स्वीकारला.

   

केंद्रिय आदिवासी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा त्यांच्या संदेशात म्हणाले की, डिजीटल तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी मंत्रालय अनेक पावले उचलत आहे. देशाच्या सर्वात दुर्गम भागापर्यंत डिजिटायजेशनचा लाभ पोहोचेल, यासाठी देखील मंत्रालय पावले उचलत आहे आणि यासारख्या उपक्रमांच्या पुढाकारामुळे तेथील आदिवासी समाजाच्या जीवनात अमूलाग्र बदल घडणार आहे.

पुरस्कार प्रदान करताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ म्हणाले की, केंद्र सरकारला डिजिटल तंत्रज्ञानाचे महत्त्व लक्षात आले आहे आणि त्यामुळे तंत्रज्ञानावर आधारित अनेक कार्यक्रम हाती घेण्यात  येत आहोत.

देशात ई – गव्हर्नन्स क्षेत्रामध्ये योगदान देणाऱ्यांची नोंद व्हावी यासाठी द कम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया (सीएसआय) यांच्या वतीने पुरस्कारांची मालिका सुरू करण्यात आली आहे. हे पुरस्कार सीएसआय – एसआयजी ई-गव्ह यांच्या वतीने दिले जातात. राज्य, विभागीय, जिल्हा आणि प्रकल्प स्तरावर ई – गव्हर्नन्स संकल्पनेच्या प्रयत्नांना मान्यता देण्यासाठी हे पुरस्कार देण्यात येतात.

ई – गव्हर्नन्स वापराबाबत आदिवासी कल्याण मंत्रालय आघाडीवर आहे. त्याचे प्रदर्शन डॅशबोर्ड, आदिवासी सक्षमीकरण – बदलता भारत हे एक  इंटरअक्टीव आणि गतिशील ऑनलाईन व्यासपीठ आहे, जे या मंत्रालयाच्या 11 योजना किंवा उपक्रमांचे अद्ययावत  आणि रियलटाइम तपशील दर्शवितो.

 

* * *

Jaydevi PS/S.Shaikh/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1697726) Visitor Counter : 162