कायदा आणि न्याय मंत्रालय
न्यायमूर्ती पुष्पा वीरेंद्र गनेडीवाला यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नेमणूक
Posted On:
13 FEB 2021 1:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी 2021
भारतीय संविधानाच्या कलम 224 (1) ने बहाल केलेल्या अधिकाराचा उपयोग करून राष्ट्रपतींनी न्यायमूर्ती पुष्पा वीरेंद्र गनेडीवाला यांची 13 फेब्रुवारी 2021 पासून एक वर्षाच्या कालावधीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नेमणूक केली आहे. यासंदर्भातील अधिसूचना, कायदा आणि न्याय मंत्रालय, न्याय विभाग यांनी काल जारी केली आहे. न्यायमूर्ती पुष्पा विरेंद्र गनेडीवाला या 26.10.2007 रोजी जिल्हा न्यायाधीश म्हणून न्यायिक सेवेत रुजू झाल्या आणि त्यांनी महाराष्ट्र राज्यातील विविध न्यायालयांमध्ये न्यायिक अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी महाराष्ट्र् न्यायिक अकादमी आणि भारतीय मध्यवर्ती केंद्र आणि प्रशिक्षण संस्था, उत्तन येथे निबंधक (दक्षता) म्हणूनही काम पाहिले आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या महानिबंधक म्हणून देखील काम पाहिले आहे. 12.02.2019 पासून दोन वर्षांच्या कालावधीसाठी त्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले होते .
* * *
Jaydevi PS/S.Shaikh/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1697682)
Visitor Counter : 175