आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाची ताजी माहिती- 28 वा दिवस


देशभरात 77.66 लाख लाभार्थ्यांचे कोविड19 प्रतिबंधक लसीकरण

आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 2,61,309 लाभार्थ्यांचे लसीकरण

गेल्या 24 तासात एकही मृत्यूची नोंद नाही

Posted On: 12 FEB 2021 10:22PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी 2021

 

कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत लसीकरण झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची आणि आघाडीवरील कर्मचाऱ्यांची संख्या आज 77.66 लाखांवर पोहोचली आहे. आतापर्यंत लसीकरणाच्या 1,63,587 सत्रांमध्ये 77,66,319 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. यामध्ये 58,65,813 आरोग्य कर्मचारी(58.9%) आणि प्रमुख आघाड्यांवर काम करणाऱ्या 19,00,506  (21.2%) कर्मचाऱ्यांचा  समावेश होता.

आजच्या 28 व्या दिवशी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत एकूण 2,61,309  लाभार्थ्यांचे कोविड19 प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. यामध्ये 50,837  आरोग्य कर्मचारी आणि प्रमुख आघाड्यांवर काम करणाऱ्या 2,10,472  कर्मचाऱ्यांचा  समावेश होता. आज रात्री उशिरा लसीकरणाचा अंतिम अहवाल पूर्ण करण्यात येईल.

35 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांमध्ये आज कोविड प्रतिबंधक लसीकरणाचे आयोजन करण्यात आले.

S. No.

State/UT

Beneficiaries vaccinated

1

A & N Islands

3454

2

Andhra Pradesh

3,48,280

3

Arunachal Pradesh

14,902

4

Assam

1,21,048

5

Bihar

4,51,621

6

Chandigarh

8017

7

Chhattisgarh

2,45,114

8

Dadra & Nagar Haveli

2890

9

Daman & Diu

1095

10

Delhi

1,66,725

11

Goa

12214

12

Gujarat

6,61,508

13

Haryana

1,94,124

14

Himachal Pradesh

72,191

15

Jammu & Kashmir

1,11,470

16

Jharkhand

1,84,568

17

Karnataka

4,90,746

18

Kerala

3,40,223

19

Ladakh

2854

20

Lakshadweep

920

21

Madhya Pradesh

5,09,168

22

Maharashtra

6,33,519

23

Manipur

18935

24

Meghalaya

12659

25

Mizoram

11332

26

Nagaland

9,073

27

Odisha

3,90,302

28

Puducherry

5514

29

Punjab

1,01,298

30

Rajasthan

5,92,412

31

Sikkim

8335

32

Tamil Nadu

2,11,762

33

Telangana

2,71,754

34

Tripura

64,773

35

Uttar Pradesh

8,31,556

36

Uttarakhand

1,04,052

37

West Bengal

4,70,912

38

Miscellaneous

84,999

Total

77,66,319

बारा  राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांनी, नोंदणी केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी 70%  हून अधिक कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण केले. ही राज्ये आहेत- बिहार, त्रिपुरा, मध्य प्रदेश, ओदिशा, उत्तराखंड, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, केरळ, लक्षद्वीप, मिझोराम, राजस्थानआणि सिक्कीम

S.No.

State/UTs

Percentage

1.

Bihar

80.2%

2.

Tripura

78.8%

3.

Madhya Pradesh

75.8%

4.

Odisha

75.7%

5.

Uttarakhand

74.6%

6.

Chhattisgarh

72.7%

7.

Himachal Pradesh

72.2%

8.

Kerala

71%

9.

Lakshadweep

70.7%

10.

Mizoram

70.5%

11.

Rajasthan

70.2%

12.

Sikkim

70.1%

तर दुसरीकडे आठ राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांनी नोंदणीकृत आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी 40 टक्कयांपेक्षा कमी कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले आहे. दिल्ली मेघालय, पंजाब, चंदीगड, तामिळनाडू, मणीपूर, नागालँड आणि पुदुच्चेरी ही ती आठ राज्य आहेत.

उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, जम्मू आणि काश्मीरपश्चिम बंगालगुजरात, कर्नाटक, छत्तीसगड , झारखंड आणि ओदिशाया 10 राज्यांमध्ये सर्वाधिक लसीकरणाची नोंद झाली आहे.

आतापर्यंत 33  व्यक्तींना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. हे प्रमाण एकूण लसीकरणाच्या 0.0004% टक्के इतके आहे. या 33 व्यक्तींपैकी 21 जणांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आलेदहा जणांचा मृत्यू झाला आणि दोघांवर उपचार सुरु आहेत. गेल्या 24 तासात ऍनाफायलेक्सिसने आजारी असलेल्या एका व्यक्तीवर पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे उपचार करण्यात आले आणि नंतर घरी सोडण्यात आले.

आतापर्यंत एकूण 24 मृत्यूंची नोंद झाली असून हे प्रमाण एकूण लसीकरणाच्या 0.0003% आहे. या 24 पैकी 9 व्यक्तींचा रुग्णालयात तर 15 जणांचा रुग्णालयाबाहेर मृत्यू झाल्याची नोंद आहे. गेल्या 24 तासात एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. आतापर्यंत लसीकरणाशी संबंधित गंभीर / तीव्र एईएफआय/मृत्यूची नोंद झालेली नाही.

राज्य / केंद्रशासित प्रदेशांना सल्ला देण्यात आला आहे की सर्व एचसीडब्ल्यू  20 फेब्रुवारी 2021 पर्यंत किमान एकदा आणि मॉप -अप फेऱ्यांद्वारे 25 फेब्रुवारी 2021 पर्यंत  लसीकरणासाठी नियोजित असावेत.

1 मार्च 2021 पर्यंत सर्व एफएलडब्ल्यूचे किमान एकदा लसीकरण नियोजित असावे  आणि 6 मार्च 2021 पर्यंत एफएलडब्ल्यूच्या मॉप -अप फेऱ्यांचा सल्ला देण्यात आला आहे.

 

 

 

S.Tupe/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1697597) Visitor Counter : 145