शिक्षण मंत्रालय

केंद्रीय अर्थसंकल्प 2021-2022: शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागासाठी ठळक तरतुदी


देशभरातील भारतीय सांकेतिक भाषेचे प्रमाणिकरण, केंद्रीय अर्थसंकल्प 2021 मधील घोषणा

Posted On: 12 FEB 2021 5:43PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी 2021

 

कर्णबधिर मुलांसाठी सरकार देशभरात भारतीय सांकेतिक भाषेचे प्रमाणिकरण करून मुलांकडून त्याच्या वापरासाठी राष्ट्रीय आणि राज्य अभ्यासक्रम सामग्री विकसित करेल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत शिक्षणाबाबतीतला पुढाकार म्हणून 2021-22 च्या अर्थसंकल्पात ही घोषणा करण्यात आली.

या घोषणेच्या अनुषंगाने शिक्षण मंत्रालयाचा शालेय शिक्षण व साक्षरता विभाग यावर्षी एप्रिलपासून पुढील गोष्टी अमलात आणेल:

  • युनिव्हर्सल डिझाईन फॉर लर्निंग (यूडीएल) च्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुस्तके ई-बुक्स मध्ये रुपांतरित केली जातील.
  • सांकेतिक भाषेचे व्हिडिओ तयार केले जातील.
  • सांकेतिक भाषेसाठी शब्दकोष / संज्ञावली विकसित केला जाईल.

या संसाधनांच्या प्रचारासाठी दीक्षा व पीएम ई-विद्यामार्फत प्रयत्न केले जातील.  यासाठी सीआयईटी, एनसीईआरटी आणि आयएसएलआरटीसी यांच्यात सामंजस्य करार झाला असून भारतीय सांकेतिक भाषेत एनसीईआरटी पाठ्यपुस्तक आधारित व्हिडिओ विकसित करण्यासाठी आयएसएलआरटीसीच्या सहकार्याने प्रयत्न सुरू आहेत.

आयएसएलच्या मानकीकरणाच्या कार्यामुळे भारतातील प्रचलित सांकेतिक भाषेच्या बोलींमध्ये काही प्रमाणात एकसमानता येऊन समाज सर्वसमावेशक बनू शकेल.हे कार्य कर्णबधिर मुलांच्या शिक्षणास प्रोत्साहन देणारे असून त्यामुळे त्यांना  त्यांची क्षमता सिद्ध करण्याची समान संधी उपलब्ध होईल. सर्व मुले सहजतेने एकमेकांशी संवाद साधू शकतील आणि एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेतील. यामुळे शालेय जीवनातील संस्कारक्षम विकासात सामावण्यास मदत होईल.

Jaydevi PS/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1697456) Visitor Counter : 116


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu