पर्यटन मंत्रालय
पर्यटन मंत्रालय 12 ते 14 फेब्रुवारी 2021 दरम्यान केवडिया स्थित स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे वार्षिक अधिवेशनासाठी देशांतर्गत टूर ऑपरेटरच्या संघटनेबरोबर भागीदारी करणार
Posted On:
10 FEB 2021 7:15PM by PIB Mumbai
पर्यटन मंत्रालय उद्योग आणि हितधारकांबरोबर सध्या सुरू असलेल्या सहकार्याचा एक भाग म्हणून 12 ते 14 फेब्रुवारी 2021 दरम्यान केवडिया मधील , स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे वार्षिक अधिवेशन आयोजित करण्यासाठी देशांतर्गत टूर ऑपरेटरच्या संघटनेला सहाय्य करणार आहे.
पर्यटन मंत्रालयाचे सचिव अरविंद सिंह म्हणाले, आंतरराष्ट्रीय पर्यटकांवर अवलंबून असलेल्या देशांच्या तुलनेत भारताकडे कोविड 19 चा परिणाम कमी करू शकेल अशी एक मजबूत देशांतर्गत बाजारपेठ आहे. लॉकडाउननंतर महामारीवर नियंत्रण मिळवण्यामुळे देशांतर्गत पर्यटन आंतरराष्ट्रीय पर्यटनाच्या तुलनेत वेगाने सुधारेल, ही वस्तुस्थिती सर्वमान्य आहे. देखो अपना देश हा पर्यटन मंत्रालयाचा एक उपक्रम आहे; 15 ऑगस्ट 2019 रोजी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाच्या अनुषंगाने हा उपक्रम असून 2022 पर्यंत प्रत्येक नागरिकाला किमान 15 ठिकाणी भेट देण्याचे आवाहन त्यांनी केले होते, ज्यायोगे देशातील पर्यटनाला चालना मिळेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेच्या विकासाला मदत होईल.
M.Chopade/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1697025)
अभ्यागत कक्ष : 143