आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाची ताजी माहिती- 26वा दिवस


देशभरात 68.26 लाख लाभार्थ्यांचे कोविड19 प्रतिबंधक लसीकरण

आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 2,15,133 लाभार्थ्यांचे लसीकरण

Posted On: 10 FEB 2021 9:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 फेब्रुवारी 2021


कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत लसीकरण झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची आणि आघाडीवरील कर्मचाऱ्यांची संख्या आज 68.26 लाखांवर पोहोचली आहे. आतापर्यंत लसीकरणाच्या 1,42,455 सत्रांमध्ये 68,26,898 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. यामध्ये 56,65,172 आरोग्य कर्मचारी(57.4%) आणि प्रमुख आघाड्यांवर काम करणाऱ्या 11,61,726 कर्मचाऱ्यांचा (13.2%) समावेश होता.

आजच्या 26व्या दिवशी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत एकूण 2,15,133 लाभार्थ्यांचे कोविड19 प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. यामध्ये 54,834 आरोग्य कर्मचारी आणि प्रमुख आघाड्यांवर काम करणाऱ्या 1,60,299  कर्मचाऱ्यांचा  समावेश होता. आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत 7,707 सत्रांचे आयोजन करण्यात आले.

33 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांमध्ये आज कोविड प्रतिबंधक लसीकरणाचे आयोजन करण्यात आले.

 

S. No.

State/UT

Beneficiaries vaccinated

1

A & N Islands

3413

2

Andhra Pradesh

3,31,786

3

Arunachal Pradesh

13,480

4

Assam

1,09,888

5

Bihar

4,22,802

6

Chandigarh

6903

7

Chhattisgarh

2,12,480

8

Dadra & Nagar Haveli

2067

9

Daman & Diu

953

10

Delhi

1,37,885

11

Goa

9961

12

Gujarat

6,05,494

13

Haryana

1,83,529

14

Himachal Pradesh

63,237

15

Jammu & Kashmir

74,219

16

Jharkhand

1,49,952

17

Karnataka

4,61,478

18

Kerala

3,25,079

19

Ladakh

2525

20

Lakshadweep

920

21

Madhya Pradesh

4,09,015

22

Maharashtra

5,59,152

23

Manipur

12948

24

Meghalaya

9745

25

Mizoram

11046

26

Nagaland

6,720

27

Odisha

3,51,058

28

Puducherry

4770

29

Punjab

91,400

30

Rajasthan

5,04,564

31

Sikkim

7677

32

Tamil Nadu

1,92,440

33

Telangana

2,48,578

34

Tripura

52,586

35

Uttar Pradesh

6,73,542

36

Uttarakhand

89,638

37

West Bengal

4,16,730

38

Miscellaneous

67,238

Total

68,26,898

तेरा राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांनी, नोंदणी केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी 65% कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण केले. ही राज्ये आहेत - बिहार, त्रिपुरा, मध्य प्रदेश, ओदिशा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, लक्षद्वीप, केरळ, मिझोराम, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, अंदमान आणि निकोबार बेटे आणि राजस्थान.

दुसरीकडे सात राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांनी नोंदणीकृत आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी 40 टक्कयांपेक्षा कमी कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले आहे. पंजाब, मेघालय, चंदीगड, तामिळनाडू, मणीपूर, नागालँड आणि पुदुच्चेरी ही ती सात राज्य आहेत.

गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगड, राजस्थान, पश्चिम बंगाल, ओदिशा, तमिळनाडू आणि बिहार या 10 राज्यांमध्ये सर्वाधिक लसीकरणाची नोंद झाली आहे.

आतापर्यंत 30 व्यक्तींना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. हे प्रमाण एकूण लसीकरणाच्या 0.0004% टक्के इतके आहे. या 30 व्यक्तींपैकी 19 जणांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले. गेल्या 24 तासात ऍनाफायलेक्सिसने आजारी असलेल्या एका व्यक्तीला पुदुच्चेरीच्या जीपमेर येथील रुग्णालयात दाखल केले असून त्या व्यक्तीची प्रकृती स्थिर आहे. आतापर्यंत 23 मृत्यूंची नोंद झाली असून हे प्रमाण एकूण लसीकरणाच्या 0.0003% आहे. या 23 पैकी 9 व्यक्तींचा रुग्णालयात तर 14 जणांचा रुग्णालयाबाहेर मृत्यू झाल्याची नोंद आहे. गेल्या 24 तासात कोणत्याही मृत्यूची नोंद झालेली नाही. आतापर्यंत लसीकरणाशी संबंधित गंभीर / तीव्र एईएफआय/मृत्यूची नोंद झालेली नाही.


* * *

S.Tupe/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1696926) Visitor Counter : 212