गृह मंत्रालय

पोलिस दलांचे आधुनिकीकरण

Posted On: 10 FEB 2021 5:12PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 फेब्रुवारी 2021


आसाम रायफल्स, सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ), केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ), भारत तिबेट सीमा पोलीस दल (आयटीबीपी), सशस्त्र सीमा दल (एसएसबी) आणि राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (एनएसजी), या केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांसाठी (सीएपीएफ) सरकार 2018 पासून 1053 कोटी रुपये खर्चाची आधुनिकीकरण योजना- III राबवत आहे.

राज्य पोलिस दलांविषयी बोलायचे झाले तर तर ‘पोलिस’ आणि ‘सार्वजनिक सुव्यवस्था’ हे राज्य घटनेच्या सातव्या परिशिष्टानुसार राज्यांच्या अखत्यारीतील विषय आहेत. असे असले तरी देखील, भारत सरकारने “पोलिसांच्या आधुनिकीकरणासाठी राज्यांना (एएसएमपी) या योजनेद्वारे सहाय्य केले आहे. राज्य पोलिस दलांच्या सुसज्ज आणि आधुनिकीकरणासाठी राज्यांतर्फे करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना पाठबळ प्रदान केले आहे.

यामध्ये वर्ष 2018-10 मध्ये पोलिसांच्या सुधारणांच्या अंमलबजावणीसाठी 7.69 कोटी रुपये आणि चांगल्या कामगिरीबद्दल प्रोत्साहन देण्यसाठी 38.26 कोटी रुपयांचा समावेश आहे. या योजनेंतर्गत, राज्य सरकारांना आधुनिक शस्त्रे, प्रशिक्षण उपकरणे, प्रगत संपर्क / न्यायवैद्यक उपकरणे, सायबर पोलिसिंग उपकरणे इत्यादींसाठी केंद्रीय मदत पुरविली जाते. याव्यतिरिक्त, ईशान्येकडील राज्ये आणि नक्षल (एलडब्ल्यूई) प्रभावित जिल्ह्यात ‘बांधकाम’ आणि ‘परिचालन वाहनांची खरेदी’ करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मागील 5 वर्षात आणि चालू वर्षात एएसएमपी योजनेंतर्गत वित्तीय खर्च खालीलप्रमाणे आहेः

 (रुपये कोटी मध्ये )

Year

Allocation

Release

2015-16

662.11

662.11

2016-17

595.00

594.02

2017-18

769.00(BE) 452.10 (RE)

451.68

2018-19

769.00

768.83

2019-20

811.30 (BE) 791.30(RE)

781.12

2020-21

770.76 (BE) 50.00(RE)

4.15 *

 

* राज्यांकडे मोठ्या प्रमाणात खर्च न केलेला निधी शिल्लक असल्यामुळे त्यांना अतिरिक्त निधी देण्यात आला नाही.

गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली.


* * *

M.Chopade/S.Mhatre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1696809) Visitor Counter : 196