पोलाद मंत्रालय

उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेअंतर्गत विशिष्ट पोलादाचा समावेश

प्रविष्टि तिथि: 10 FEB 2021 3:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 फेब्रुवारी 2021

 

पोलाद क्षेत्रात भांडवल गुंतवणूक आकर्षित करून रोजगार निर्मिती आणि अद्ययावत तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी देशात विशिष्ट पोलाद  उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी पुढील पाच वर्षात 6322 कोटी रुपयांच्या खर्चासह उत्पादन संलग्न प्रोत्साहन (पीएलआय) योजनेअंतर्गत 'विशिष्ट पोलाद; च्या समावेशाला  सरकारने मंजुरी दिली आहे. यामुळे देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी देशाला आत्मनिर्भर  बनवून देशात 'विशिष्ट पोलाद'ची उपलब्धता सुधारण्यास मदत होईल. अनियंत्रित खुल्या बाजारपेठेt, पोलादाची  किंमत बाजारातील मागणी आणि पुरवठा, कच्च्या मालाच्या किंमतीतील कल यानुसार ठरते आणि जागतिक  पोलाद व्यापाराच्या परिस्थितीचाही त्यावर प्रभाव पडतो. 

केंद्रीय पोलाद मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.


* * *

Jaydevi PS/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1696743) आगंतुक पटल : 149
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Telugu , English , Manipuri , Urdu , Tamil