अर्थ मंत्रालय
प्रधानमंत्री जन-धन योजने अंतर्गत 41 कोटी 75 लाख खाती उघडण्यात आली
Posted On:
08 FEB 2021 8:45PM by PIB Mumbai
प्रादेशिक ग्रामीण बँकांसह सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि 14 प्रमुख खासगी क्षेत्रातील बँकांनी दिलेल्या माहितीनुसार 27 जानेवारी 2021 पर्यंत प्रधानमंत्री जन-धन योजने अंतर्गत देशात एकूण 41 कोटी 75 लाख खाती उघडण्यात आली आहेत आणि यापैकी 35 कोटी 96 लाख खात्यांमध्ये व्यवहार होत आहेत.
केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी आज लोकसभेत लिखित उत्तराद्वारे ही माहिती दिली.
प्रधानमंत्री जन-धन योजने अंतर्गत प्रादेशिक ग्रामीण बँकांसह सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये एकूण 40 कोटी 48 लाख खाती तर 14 प्रमुख खासगी क्षेत्रातील बँकांमध्ये 1 कोटी 27 लाख खाती उघडण्यात आली आहेत असेही त्यांनी पुढे सांगितले.
***
S.Tupe/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1696314)
Visitor Counter : 138